महावितरणच्या सहायक अभियंत्यास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:38 IST2021-09-22T04:38:21+5:302021-09-22T04:38:21+5:30

फिर्यादी महावितरणचे सहायक अभियंता संजोग रमेश सातव (४३) हे २० सप्टेंबर रोजी त्यांचे सहकारी श्यामसुंदर दगडुबा जाधव, अमोल मधुकर ...

Assault on MSEDCL Assistant Engineer | महावितरणच्या सहायक अभियंत्यास मारहाण

महावितरणच्या सहायक अभियंत्यास मारहाण

फिर्यादी महावितरणचे सहायक अभियंता संजोग रमेश सातव (४३) हे २० सप्टेंबर रोजी त्यांचे सहकारी श्यामसुंदर दगडुबा जाधव, अमोल मधुकर हिवाळे, शिवाजी साहेबराव कोल्हे यांच्यासह ग्राम भादोला येथे थकीत वीज बिलांच्या वसुलीकरिता गेलो होते. सुरुवातीला त्यांनी इतर घरून वीज बिलाची वसुली केली. त्यानंतर शेख जुबेर शेख अय्युब (रा. भादोला) यांच्याकडे असलेल्या थकीत ११ हजार रुपये वीज बिलाची मागणी केली. वीज बिल भरले नाही तर तुमचा वीज पुरवठा खंडित केला जाईल, अशी सूचनाही दिली. तरीसुद्धा शेख जुबेर शेख अय्युब याने थकीत वीज बिलाचा भरणा न केल्यामुळे त्याची वीज जोडणी तात्पुरती खंडित केली व तत्काळ थकीत वीज बिल भरणा करण्याबाबत त्याच्या कुटुंबीयांना सूचना दिल्या. मात्र तेथून पुढील कारवाईसाठी गावामध्ये गेल्यानंतर दुपारी ३ वाजता वाडी रोडवर आरोपी शेख जुबेर शेख अय्युब हा तेथे अचानक आला त्याने कर्मचारी श्यामसुंदर दगडुबा जाधव यांना अश्लील शिवीगाळ केली. त्यानंतर फिर्यादीलाही शिवीगाळ करून काठीने मारहाण केली. यामध्ये फिर्यादी अभियंता हे जखमी झाले. याप्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ग्रामीण पोलीस करीत आहेत.

Web Title: Assault on MSEDCL Assistant Engineer