माकोडी येथील आषाढी एकादशी व गुरुपौर्णिमा उत्सव स्थगित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:22 IST2021-07-12T04:22:28+5:302021-07-12T04:22:28+5:30
बुलडाणा : रामनामाचा प्रसार आणि प्रचारासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घालत असलेले समर्थ सद्गुरू श्रीहरी महाराज यांच्या प्रमुख ...

माकोडी येथील आषाढी एकादशी व गुरुपौर्णिमा उत्सव स्थगित
बुलडाणा : रामनामाचा प्रसार आणि प्रचारासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घालत असलेले समर्थ सद्गुरू श्रीहरी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनात श्रीक्षेत्र माकोडी येथे साजरा केला जाणारा आषाढी एकादशी उत्सव व गुरुपौर्णिमा उत्सव सोहळा काेराेनामुळे यावर्षी रद्द करण्यात आला आहे. मंदिरातील नित्य नियमित पूजा व धार्मिक विधी मंदिरातच पार पाडण्यात येणार आहे. यानिमित्ताने दरवर्षी भाविकांकडून काढण्यात येणारी पायी वारी व अन्य धार्मिक सोहळे यंदा रद्द करण्यात आले आहेत. श्रीक्षेत्र माकोडी येथे आषाढी एकादशी व गुरुपौर्णिमा उत्सवाला शेकडाे भाविक हजेरी लावतात. परंतु यंदा जगभरामध्ये कोरोना विषाणूचा फैलाव झाला आहे. दुसरी लाट आटोक्यात येत असली तरी तिसऱ्या लाटेचा धोका तज्ज्ञांनी वर्तवला आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे माकोडी येथे दरवर्षी होणारे उपरोक्त दोन्ही उत्सव सोहळे यंदा स्थगित करण्यात आले आहेत. भाविकांनी पायी वारी करत येऊ नये, प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे. घरी राहूनच नामजप करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.