कालबद्ध पदोन्नती, सातवा वेतन लागू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:39 IST2021-07-14T04:39:48+5:302021-07-14T04:39:48+5:30

श्री शिवाजी महाविद्यालय चिखली व जिजामाता महाविद्यालय बुलडाणा येथील कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी यासंदर्भाने उदय सामंत यांची भेट घेऊन उपरोक्त ...

Apply periodic promotion, seventh pay | कालबद्ध पदोन्नती, सातवा वेतन लागू करा

कालबद्ध पदोन्नती, सातवा वेतन लागू करा

श्री शिवाजी महाविद्यालय चिखली व जिजामाता महाविद्यालय बुलडाणा येथील कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी यासंदर्भाने उदय सामंत यांची भेट घेऊन उपरोक्त मागणीसंदर्भाने निवेदन दिले. यावेळी उपस्थित आमदार संजय गाकवाड यांनादेखील याबाबत निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे राजू करपे, धनू ताठे, दिलीप पखानं, संदीप गवई, सुरेश सोळंकी, के. डी. पठाण, तेजराव वाघ, अनिल चाटे, विनोद आराख, चंद्रकांत राजपूत, सचिन चव्हाण, अनिल बाहेकर, अतिष गिते, पी.सोनुने, व्ही. डी. सावळे, हरिभाऊ चव्हाण, विनोद सपकाळ, रामदास भोंडे, कुरेशी, संजय भगत, के. के. चव्हाण, यू. डी. कानडजे, ए. आर. शेख, बबन पवार आदी कर्मचारी उपस्थित होते.

प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन

सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबत तातडीने कार्यवाही करून दिलासा द्यावा, अशी मागणी महाविद्यालयी कर्मचाऱ्यांच्या वतीने करण्यात आली. दरम्यान, कर्मचाऱ्यांच्या निवेदनाची दखल घेत सामंत यांनी हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे.

Web Title: Apply periodic promotion, seventh pay