लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: रविवारी तपासण्यात आलेल्या ७८१ अहवालांपैकी ७८ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले असून, ७०३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. दरम्यान, मलकापूर येथील ६३ वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची एकूण संख्या आता १३८ झाली आहे. जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधितांची ११ हजार ५७० वर पोहोचली असून, त्यापैकी ११ हजार ११९ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना सुटी देण्यात आली आहे.रविवारी पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा ११, नांदुरा सहा, सिंदखेड राजा तालुक्यातील सावखेड तेजन येथील आठ, पांगरखेड येतील तीन, जांभोरा येथील एक, पिंपळखुटा येथील एक, देऊळगाव राजा तालुक्यातील टेंभुर्णी येथील एक, मेहुणा राजा येथील एक, जवळखेड एक, शेगाव चार, मोताळा तालुक्यातील धामणगाव बढे येथील तीन, खामगाव शहरातील सहा, देऊळगाव राजा शहरातील तीन, बुलडाणा तालुक्यातील कोलवड येथील एक, हराळखेड येथील एक, पांगरी एक, चिखली तालुक्यातील भरोसा येथील दोन, चिखली शहरातील नऊ, नांदुरा तालुक्यातील अंबोडा येथील एक, शेंबा बुद्रूक येथील दोन, जळगाव जामोद येथील एक, सिंदखेड राजा शहरातील नऊ आणि अमरावती जिल्ह्यातील अंबरनाथ येथील एकाचा यामध्ये समावेश आहे. दुसरीकडे ६४ जणांनी रविवारी कोरोनावर मात केली.
बुलडाणा जिल्ह्यात कोरोनाचा आणखी एक बळी, ७८ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 11:29 IST