जिल्ह्यात आणखी ७० काेराेना पाॅझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:35 AM2021-01-19T04:35:55+5:302021-01-19T04:35:55+5:30

बुलडाणा : जिल्ह्यात काेराेना रुग्णांची संख्या वाढतच असल्याचे चित्र आहे. साेमवारी आणखी ७० जणांचा काेराेना अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. ...

Another 70 cases in the district are positive | जिल्ह्यात आणखी ७० काेराेना पाॅझिटिव्ह

जिल्ह्यात आणखी ७० काेराेना पाॅझिटिव्ह

googlenewsNext

बुलडाणा : जिल्ह्यात काेराेना रुग्णांची संख्या वाढतच असल्याचे चित्र आहे. साेमवारी आणखी ७० जणांचा काेराेना अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. तसेच ३१८ काेराेना अहवाल निगेटिव्ह आले असून, ४४ जणांनी काेराेनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण ३८८ अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी ३१८ अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, ७० अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील ६९ व रॅपिड ॲन्टिजेन टेस्टमधील ९ अहवालांचा समावेश आहे.

पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये बुलडाणा शहरातील १९, बुलडाणा तालुका येळगाव १, सिंदखेड मातला १, नांद्राकोळी १, चिखली शहरातील १, चिखली तालुका खैरव १, गांगलगाव १, चंदनपूर ३, अंत्री खेडेकर २, मोताळा तालुका पोफळी ३, दे.राजा तालुका सिनगाव जहागीर ४, दे.राजा शहरातील ४, खामगाव शहरातील १२, खामगाव तालुका टेंभुर्णा १, सुटाळा १, घाटपुरी २, किन्ही महादेव १, मेहकर शहरातील ७, शेगाव शहरातील ३, लोणार शहरातील १, लोणार तालुका सिंधी येथील एका रुग्णाचा समावेश आहे.

तसेच काेराेनावर मात केल्याने बुलडाणा अपंग विद्यालय १, स्त्री रुग्णालय ५, शेगाव ५, खामगाव १५, लोणार ४, दे.राजा ३, जळगाव जामोद ६, मोताळा २, चिखली ३ रुग्णांना सुटी देण्यात आली. आजपर्यंत ९७ हजार ३०८ रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत १२ हजार ८५७ कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे.

तसेच ५५६ स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण १३ हजार ३८१ काेराेनाबाधित असून, त्यापैकी १२ हजार ८५७ कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रुग्णालयात ३६५ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत १५९ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

Web Title: Another 70 cases in the district are positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.