कोरोना महामारीची वर्षपुर्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:32 IST2021-03-28T04:32:46+5:302021-03-28T04:32:46+5:30

या मृत व्यक्तीचे स्वॅब नमुने ‘हार्ड अ‍ॅन्ड फास्ट’ तत्वावर नागपूर येथे पाठविण्यात आले होते. मृत व्यक्ती ही बुलडाणा शहरातीलच ...

Anniversary of the Corona Epidemic | कोरोना महामारीची वर्षपुर्ती

कोरोना महामारीची वर्षपुर्ती

या मृत व्यक्तीचे स्वॅब नमुने ‘हार्ड अ‍ॅन्ड फास्ट’ तत्वावर नागपूर येथे पाठविण्यात आले होते. मृत व्यक्ती ही बुलडाणा शहरातीलच असून ती वयोवृद्धही नव्हती. बुलडाणा शहरातीलच एका खासगी रुग्णालयामध्ये दोन दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र त्यांचा निमोनिया हा अधिकच वाढत गेल्यामुळे त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतरच त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, मृत पावलेल्या रुग्णाचा मृत्यू हा कोरोना विषाणूच्या संसर्गाने झाला असल्याचे स्पष्ट होताच सर्वत्र खळबळ उडाली होती. नागपूर येथील इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयातील विषाणू तपासणी प्रयोग शाळेने दिलेल्या अहवालानंतर ही बाब स्पष्ट झाली होती. पश्चिम वऱ्हाडातील कोरोनाचा हा पहिलाच बळी होता.

औषधसाठा उपलब्ध आहे का?

जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता झपाट्याने वाढत आहे. त्या तुलनेत आरोग्य विभागाने औषधसाठाही वाढविला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयासह कोविड सेंटर व ग्रामीण रुग्णालयांमध्येही औषधसाठा मुबलक ठेवण्यात आला आहे.

पहिल्या पॉझिटिव्हचा मृत्यू

बुलडाणा जिल्ह्यात मार्च २०२० मध्ये सापडलेल्या पहिल्या कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णाचा जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती केल्यानंतर तासाभरातच मृत्यू झाला होता. त्यानंतर पॉझिटिव्ह आलेल्यांची प्रकृती आता चांगली आहे.

२८ मार्च २०२०

रोजी जिल्ह्यातील पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला.

कोरोनाचे एकूण रूग्ण - ३४००५

बरे झालेले - २७४८०

एकूण बळी - २४७

सध्या उपचार सुरू असलेले - ६२७८

असे वाढले रूग्ण (ग्राफ)

मार्च २०२० - ३

एप्रिल २४

मे ५९

जून २३५

जुलै १२६८

ऑगस्ट ३१३४

सप्टेंबर ७१८५

ऑक्टोबर ९४२४

नोव्हेंबर ११२६१

डिसेंबर १२५१८

जानेवारी २०२१ - १३९६३

फेब्रुवारी २०२१- १८६६८

मार्च २०२१- ३४००५

Web Title: Anniversary of the Corona Epidemic