अंगणवाडी सेविकांचा खामगावात मोर्चा, आयुक्तांच्या पत्राची केली होळी
By अनिल गवई | Updated: December 27, 2023 18:58 IST2023-12-27T18:58:02+5:302023-12-27T18:58:30+5:30
खामगाव: आपल्या विविध न्याय मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका व मदतनीस चार डिसेंबरपासून संपावर गेल्या आहेत. दरम्यान, बुधवारी नांदुरा रोडवरील एकात्मिक ...

अंगणवाडी सेविकांचा खामगावात मोर्चा, आयुक्तांच्या पत्राची केली होळी
खामगाव: आपल्या विविध न्याय मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका व मदतनीस चार डिसेंबरपासून संपावर गेल्या आहेत. दरम्यान, बुधवारी नांदुरा रोडवरील एकात्मिक बाल िवकास सेवा योजना प्रकल्प कार्यालयावर अंगणवाडी सेविकांनी धडक मोर्चा काढला. यावेळी राज्य शासनाविरोधात तीव्र निदर्शने आणि घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर पत्रकाची होळी करण्यात आली.
याबाबत सविस्तर असे की, विविध न्याय मागण्यासाठी ४ डिसेंबरपासून अंगणवाडी सेविका, मदतनीस संपावर असल्याने अंगणवाडी इमारती बंद आहेत. दरम्यान, आयुक्तांनी पत्र देत, अंगणवाडीचे कुलूप तोडून आहार दुसर्या व्यक्तींना शिजवायला सांगा. यामध्ये बचत गटातील महिला, शालेय शिक्षकांची मदत घेण्याचे सुचविले आहे. तसेच कुलूप तोडून काम करण्याचे देखील नमूद केले आहे. या पत्रात अंगणवाडी कर्मचार्यांचा अपमान करण्यात आल्याचेही नमूद केले आहे. परिणामी शासनाचा निषेध नोंदविण्यासाठी अंगणवाडी बालवाडी कर्मचारी संघटना आयटक खामगाव तालुका सचिव गीता नवथळे यांच्या नेतृत्वात शेकडो अंगणवाडी सेविका, मदतनिसांनी बुधवारी शासनाचा निषेध केला.