अमडापूर : दुसर्‍या लग्नास संमती न देणार्‍या विवाहितेचा छळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 00:33 IST2018-02-01T00:32:59+5:302018-02-01T00:33:48+5:30

अमडापूर : दुसरे  लग्न करण्यासाठी संमती द्यावी आणि माहेराहून पैसे आणावे, या कारणावरून जळगाव जिल्ह्यातील शहापूर येथील विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी अमडापूर पोलिसांनी आठ जणांविरोधात ३१ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल केला आहे.

Amadapur: Marriage of unmarried married woman gets tortured! | अमडापूर : दुसर्‍या लग्नास संमती न देणार्‍या विवाहितेचा छळ!

अमडापूर : दुसर्‍या लग्नास संमती न देणार्‍या विवाहितेचा छळ!

ठळक मुद्देआठ जणांविरोधात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
अमडापूर : दुसरे  लग्न करण्यासाठी संमती द्यावी आणि माहेराहून पैसे आणावे, या कारणावरून जळगाव जिल्ह्यातील शहापूर येथील विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी अमडापूर पोलिसांनी आठ जणांविरोधात ३१ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल केला आहे.
कविता संतोष पंडित असे तक्रार करणार्‍या विवाहितेचे नाव आहे.  जळगाव जिल्ह्यातील शहापूर येथे तिचा  २0१६ रोजी विवाह झाला होता. लग्नाच्या प्रारंभीचे काही दिवस चांगले गेले; मात्र पती संतोष पंडित, सुभाष  पंडित, मंगला पंडित, राहुल पंडित, रमेश पंडित, दीपाली पंडित ( सर्व रा. शाहापूर), संगीता जवंजाळ, सविता मोहन ढोले (रा. भुसावळ) यांनी माहेराहून दोन लाख रुपये आणावे आणि मुलास दुसरे लग्न करण्यास संमती द्यावी, या कारणावरून त्रास देऊ लागले. त्यामुळे त्रस्त झालेल्या कविताने याप्रकरणी सासरकडील आठ व्यक्तींविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. किन्ही नाईक येथे सध्या पीडित विवाहिता राहते.

Web Title: Amadapur: Marriage of unmarried married woman gets tortured!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.