वडिलांपाठोपाठ तरुण मुलाचाही कोरोनामुळे मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 17:57 IST2021-05-03T17:57:15+5:302021-05-03T17:57:37+5:30

Father and young boy died due to corona : एकाच घरातील दोघांचा अठ्ठेचाळीस तासांत मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे.

Along with the father, the young boy also died due to corona |   वडिलांपाठोपाठ तरुण मुलाचाही कोरोनामुळे मृत्यू

  वडिलांपाठोपाठ तरुण मुलाचाही कोरोनामुळे मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क
निमगाव : येथील ७५ वर्षीय वृद्धाचा १ मे रोजी मृत्यू झाला.  अठ्ठेचाळीस तासांचा कालावधी उलटला नाही तर त्यांच्या तरुण विधिज्ञ मुलाचा २ मे रोजी संध्याकाळी कोरोनाने मृत्यू झाला. एकाच घरातील दोघांचा अठ्ठेचाळीस तासांत मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे.
कोरोनाची दुसरी लाट शहरासोबत ग्रामीण भागातही कहर करत असून, वाढत्या रुग्णसंख्येमुळे ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. निमगाव येथील ७५ वर्षीय नागरिक व त्यांचा ३६ वर्षीय तरुण विधिज्ञ मुलगा या दोघांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने, वडील खामगाव येथील खासगी कोविड सेंटरवर तर मुलगा शेगाव येथील खासगी कोविड सेंटरवर उपचार घेत होता. १ मे रोजी सायंकाळी वडिलांची प्रकृती खालावली व त्यांचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यांचा अंत्यसंस्कार करून घरी परतलेल्या कुटुंबीयांना मुलाचीही प्रकृती खालावल्याचे समजले. त्याचा कोरोनाने ३ मे रोजी सकाळी अठ्ठेचाळीस तासांच्या आत मृत्यू झाला. ३ मे रोजी सकाळी निमगाव येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. वडिलांपाठोपाठ तरुण विधिज्ञ मुलाचा कोरोनाने बळी घेतल्याने येथील नागरिक भयभीत व चिंताग्रस्त झाले आहे.

Web Title: Along with the father, the young boy also died due to corona