पर्यावरण रक्षणासोबतच बेरोजगारीवर मात!

By Admin | Updated: June 4, 2014 23:51 IST2014-06-04T23:35:30+5:302014-06-04T23:51:09+5:30

पर्यावरण दिन विशेष : टाकाऊ वस्तूंपासून आकर्षक वस्तूंची निर्मिती

Along with environmental protection, unemployment can be overcome! | पर्यावरण रक्षणासोबतच बेरोजगारीवर मात!

पर्यावरण रक्षणासोबतच बेरोजगारीवर मात!

अनिल गवई /खामगाव

इतरांच्या नजरेत तो कचरा.. त्यामुळे घरातील डस्टबीन.. बाहेरचा उकीरडा.. अन् शेतीच्या बांधावरील जाळण्याची जागा इथेच त्याचे अस्तित्व. मात्र, याच कचर्‍याचा खामगावातील एका महिलेने उपयोग करून त्यापासून चक्क शोभेच्यावस्तू करून त्या लोकांच्या दिवानखान्यात पोहोचविल्या आहेत. कचर्‍यापासून आकर्षक शोभीवंत वस्तू निर्माणासाठी अनेक हातांची जोड मिळाल्याने पर्यावरण रक्षणासोबतच काही अंशी बेरोजगारीवरही मात करणे शक्य होत आहे. शहरातील नीता बोबडे यांच्या कल्पक दृष्टीतून नैसर्गिक आणि कृत्रिम कचर्‍या पासून अतिशय आकर्षक वस्तूंची निर्मिती केल्या जात आहे. या वस्तूं स्वत:पुरत्या, शहरापुरत्या र्मयादित न ठेवता त्यांनी इतरांना प्रशिक्षित करण्याचे प्रयत्न चालविले आहेत. त्यामुळे शहरातील अनेक बरोजगार मुलींच्या हातालाही काम मिळाले आहे. कचर्‍यापासून आकर्षक दागिणे, फुलदाण्या, फ्रेम आदी शोभीवंत वस्तू घडविल्या जात आहे. इको फ्रेन्डली ज्वेलरी तयार करण्यासाठी निलगीरीचे सुकलेले फळ, गुंजेच्या बिया वापरून अतिशय आकर्षक दागिणे तयार केले जात आहे. त्याचप्रमाणे कांदा, लसूण आणि मक्याची साल, रूईच्या केसाळ बिया, शेता तील वाळलेली पाने, फुले, सुकलेल्या नारळाचे देठ या नैसर्गिक कचर्‍यापासून आर्कषक फुलं, बुके आणि फ्रेम त्यांनी तयार केल्या आहेत. या शिवाय प्लॉस्टिक पिशव्या, थर्माकोल, दुधाच्या पांढर्‍या िपशव्या यापासूनही त्यांनी विविध प्रकारची फुलेही घडविण्यात येत असल्यामुळे पर्यावरणाचे रक्षण केल्या जात आहे. या कलेचे इ तरांना प्रशिक्षण देऊन ह्यकचर्‍यातून कला, कलेतून पैसाह्ण या उक् तीने बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी प्रयत्नरत आहेत. त्यांच्या या प्रयत्नांमुळे एक दिवस ह्यउकीरड्याचे दिवस पालटतातह्ण ही म्हण प्रत्यक्षात उतरत आहे. हे येथे उल्लेखनिय!

Web Title: Along with environmental protection, unemployment can be overcome!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.