सैलानी दर्गा परिसरातील सर्व दुकाने बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:36 IST2021-04-02T04:36:10+5:302021-04-02T04:36:10+5:30

पिंपळगाव सराई: सैलानी दर्गा परिसरातील सर्व दुकाने २ एप्रिल रोजी बंद ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. बुलडाणा तालुक्यातील सर्व धर्मश्रद्धा ...

All shops in Sailani Dargah area closed | सैलानी दर्गा परिसरातील सर्व दुकाने बंद

सैलानी दर्गा परिसरातील सर्व दुकाने बंद

पिंपळगाव सराई: सैलानी दर्गा परिसरातील सर्व दुकाने २ एप्रिल रोजी बंद ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

बुलडाणा तालुक्यातील सर्व धर्मश्रद्धा स्थान असलेल्या सैलानी बाबा दर्गा परिसरातील रंगपंचमीच्या दिवशी म्हणजे २ एप्रिल रोजी कोरोना विषाणू संसर्गामुळे सैलानी दर्गा परिसरात भाविकांची गर्दी होऊ नये त्यासाठी बुलडाणा जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार सैलानी दर्गा परिसरातील फुल शिरणी\चे दुकाने व हॉटेल इतर दुकाने २ एप्रिल रोजी पूर्णत: बंद राहतील, असा आदेश बुलडाणा उपविभागीय अधिकारी यांनी काढला आहे. या आदेशाचे पालन करून स्थानिक व्यापारी व भाविक यांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन रायपूर ठाणेदार सुभाष दुधाळ यांनी आवाहन केले आहे.

चौकट...

संदल मिरवणूक रद्द!

दरवर्षी रंगपंचमीला पिंपळगाव सराई येथून उंटावरून सैलानी बाबाचा संदल मिरवणूक निघून सैलानी दर्गावर लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये सैलानी बाबाचा संदल चढवला जातो. परंतु कोरोनाच्या वाढत्या प्रादुभार्वामुळे संदल मिरवणूक प्रशासनाने रद्द केली आहे.

Web Title: All shops in Sailani Dargah area closed