दारू वाहतूक; गुन्हा दाखल
By Admin | Updated: June 17, 2017 00:15 IST2017-06-17T00:15:47+5:302017-06-17T00:15:47+5:30
मोताळा : विनापरवानगी देशी दारूची वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली असून, पोलिसांनी पकडसत्र सुरू केले आहे.

दारू वाहतूक; गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
मोताळा : विनापरवानगी देशी दारूची वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली असून, पोलिसांनी पकडसत्र सुरू केले आहे. दोन दुचाकीस्वारांना बोराखेडी पोलिसांनी सापळा रचून गुरुवारी रात्री शेलापूर-मोताळा मार्गावर पकडले. यावेळी अवैध देशी दारूसह दोन मोटारसायकली असा ७९ हजार ८०० रुपयांचा मुद्येमाल जप्त करून तिघांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
शेलापूर ते मोताळा मार्गावरून दोन इसम अवैधरीत्या देशी दारूची विनापरवानगी वाहतूक करीत असल्याची गुप्त माहिती मिळाली. या आधारे सुनील हिवाळे, प्रवीण पडोळ, पोकाँ मंगेश पाटील यांच्या पथकाने १९२ नग देशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या.