शहरं
Join us  
Trending Stories
1
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
2
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
3
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
4
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
5
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
6
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
7
"माझी मुलं श्रेयस अय्यरला हाक मारताना..."; प्रिती झिंटाने IPLच्या 'सरपंच'बद्दल केला खुलासा
8
Harsha Richhariya : "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान
9
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
10
रशियाने दिलेला शब्द पाळला! चौथी S-400 प्रणाली भारतात दाखल; आता शत्रूचे विमान हवेतच भस्म होणार
11
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
12
चेअर कार, स्लीपर, मेट्रो झाली, आता वंदे भारत कार्गो येणार, मालवाहतूक क्षमता अन् वेग किती?
13
भारतात उष्णतेची लाट, तिकडे चीनमध्ये महापूर, रस्ते, घरे, वाहने पाण्याखाली
14
बुध प्रदोष २०२६: कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा आणि कोणाचा सुरु होणार कठीण काळ?
15
Post Officeची जबरदस्त योजना : एकदाच करा गुंतवणूक आणि दरमहा मिळवा ₹९,२५०; ५ वर्षांनी संपूर्ण पैसेही परत
16
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
17
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
18
Gold Silver Price Today: ₹५००० पेक्षा अधिकनं घसरला चांदीचा भाव; सोन्याच्या दरातही मोठी घसरण; आज इतक्या रुपयांना मिळतंय १० ग्रॅम Gold
19
६.८३-इंच AMOLED डिस्प्ले, १०,२०० mAh बॅटरी; Vivo Y600 लॉन्च, जाणून घ्या किंमत!
20
मुंबईतून सुटणारी वंदे भारत ट्रेन आता कायस्वरुपी २० कोचसह धावणार; प्रवासी क्षमता किती वाढणार? 
Daily Top 2Weekly Top 5

बंदीनंतरही मेहकरात दारूचा महापूर

By admin | Updated: April 19, 2017 00:02 IST

चढ्या भावाने होते दारूची विक्री : चोरट्या मार्गाने होत आहे विक्री

उद्धव फंगाळ - मेहकरन्यायालयाच्या आदेशानुसार राष्ट्रीय महामार्गावरील परवानाधारक देशी विदेशी दारूची दुकाने, वाइन बार, वाइन शॉप, बीअर शॉप १ एप्रिलपासून बंद केली आहेत. त्यानंतर दारू पिणाऱ्यांमध्ये चांगला गोंधळ उडाला आहे. गावरान दारूला महत्त्व आल्याचे चित्र सर्वत्र पाहावयास मिळत आहे. दारूबंदीनंतर मेहकर उपविभागात गावरान, देशी-विदेशीसह इतर दारूंची मोठ्या प्रमाणात अवैध विक्री सुरू आहे; परंतु याकडे पोलीस विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याने न्यायालयाच्या दारूबंदीच्या आदेशानंतर अवैध दारू विक्रीचा महापूर दिसून येत आहे. दारूच्या आहारी जाऊन युवा वर्ग, सर्वसामान्य माणूस व्यसनाधीन होत चालला आहे. दारूमुळे गोरगरिबांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. दारू व्यवसाय कायमचा बंद व्हावा, यासाठी ग्रामीण भागातून सतत मागणी होत आहे; मात्र या गंभीर समस्येकडे पोलीस विभागाचे नेहमीच दुर्लक्ष होताना दिसते. ग्रामीण भागात दारू विक्रीला शासकीय परवाना नसला तरी काही मोठ्या खेडेगावात देशी दारू विक्रीचा शासकीय परवाना आहे. परंतु ज्या गावात परवाना नाही, त्या गावामध्ये संबंधीत बिट जमादाराला हाताशी धरून आर्थिक देवाण-घेवाण करून अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे. खेडेगावातील अशी अवैध दारू विक्री बंद व्हावी, यासाठी महिला मंडळ, सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटना वेळोवेळी आंदोलन करून पोलीस विभागाकडे तक्रारी करीत असतात; मात्र संबंधित पोलीस स्टेशनचे अधिकारी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. अशा प्रकारे अवैध दारू विक्रीचे व्यवसाय सुरू असल्यास कोणत्याही तक्रारीची वाट न पाहता पोलिसांनी अवैध दारू विक्री बंद करायला पाहिजेत. मात्र तसे होताना दिसत नाही. अनेक ठिकाणी ग्रामीण भागात दारू पुरविणारे ठेकेदार व संबंधित पोलीस विभाग यांचे जवळचे हितसंबंध असल्याने कारवाया होत नाहीत. गेल्या १५ दिवसांपासून सर्वच ठिकाणी दारू विक्री बंद आहे.