शेतमालाला हमीभावापेक्षाही कमी भाव; शेतकरी ंिचंतातूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2019 02:00 PM2019-11-15T14:00:32+5:302019-11-15T14:00:40+5:30

सोयाबीन ८०० रुपये ते ३००० तर ज्वारी ८०० ते २००० रुपये भावाने विकल्या जात आहे.

Agriculture yields get Lower prices than guaranteed; Farmers worried | शेतमालाला हमीभावापेक्षाही कमी भाव; शेतकरी ंिचंतातूर

शेतमालाला हमीभावापेक्षाही कमी भाव; शेतकरी ंिचंतातूर

googlenewsNext

- योगेश फरपट 
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: पंधरवाड्यात झालेल्या पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सोयाबीन ८०० रुपये ते ३००० तर ज्वारी ८०० ते २००० रुपये भावाने विकल्या जात आहे. या रकमेत झालेला खर्चही निघत नसल्याची व्यथा शेतकऱ्यांनी ‘लोकमत’जवळ गुरुवारी मांडली.
पाऊस पुर्णपणे बंद झाल्याने शेतकऱ्यांनी शेतातील पीके काढण्यास सुरवात केली. माल जास्त खराब झाला असल्याने साठवणूक करणे शक्य नाही. त्यामुळे शेतकºयाकडून हा माल विक्रीसाठी बाजार समितीत आणण्यात येत आहे. मात्र बाजार समिती प्रशासनाच्या दिरंगाईमुळे दोन ते तीन दिवसापासून शेतकºयांच्या मालाची खरेदी होत नसल्याचे दिसून येते. यामुळे शेतकरी ंिचंतातूर झाले आहेत. बुधवारी, १३ नोव्हेंबररोजी खामगाव बाजारपेठेत ज्वारी विक्रीसाठी आणली होती. पावसाने ज्वारीचा दर्जा घसरला. त्यामुळे व्यापाºयांनी पुर्णपणे खरेदीकडे पाठ फिरवल्याने ज्वारी खरेदी होवू शकली नव्हती. अखेर काही शेतकºयांनी लोकप्रतिनिधींकडे तक्रारी केल्या.
बाजार समितीचे प्रशासक महेश कृपलानी यांच्याशी चर्चा केल्यानंतर अखेर आज या शेतकºयांची ज्वारी खरेदी होवू शकली. हा प्रकार निंदनीय असल्याचा आरोप काही शेतकºयांनी केला. गुरुवारी बाजार समितीत मोठ्या प्रमाणात सोयाबीन विक्रीसाठी आणण्यात आले होते.
यामुळे काही प्रमाणात गोंधळ उडालेला दिसून आला. बाजार समितीचा कारभार वाºयावर असल्याचे यानिमित्ताने दिसून आले. सध्या बाजार समितीवर प्रशासक नेमण्यात आले आहेत. त्यांच्याकडे इतरही पदभार असल्याने बाजार समितीच्या कारभाराकडे त्यांचे लक्ष नसल्याचे दिसून येते. जिल्हा प्रशासनाने याची दखल घेवून बाजार समितीतील कारभार सुरळीत करण्याकडे लक्ष देण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे.


दिवाळी झाली तरी कापसाचा पत्ता नाही!
दसरा किंवा दिवाळीला शेतकºयांच्या घरात कापूस भरलेला राहतो. यावर्षी मात्र दिवाळी झाली तरी कापसाचे बोंडही नसल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. गत पंधरवाड्यात झालेल्या पावसाने कपाशीचे पीक धोक्यात आले आहे. कपाशीच्या बोंड्या गळून पडल्याने शेतकºयांवर आर्थीक संकट कोसळले आहे. अनेक शेतकºयांनी तर कपाशीचे उभे पीक नांगरून टाकले आहे.


मी सोयाबीन उत्पादक शेतकरी असून बाजारसमितीत सोयाबीन विक्रीला आणले होते. सोयाबीनला गेल्या वर्षीपेक्षा अर्धाही भाव मिळाला नाही.
- श्रीकृष्ण आसोलकर,
येऊलखेड.

 

Web Title: Agriculture yields get Lower prices than guaranteed; Farmers worried

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.