नांदुरा: परिचय मेळाव्यातून वेळ व पैसा तर वाचतोच शिवाय समाजाचे एकत्रीकरण होते, असे प्रतिपादन आमदार अॅड. आकाश फुंडकर यांनी केले. नांदुरा येथे 2 डिसेंबर रोजी माळी समाज राज्यस्तरीय युवक युवती परिचय मेळावा संपन्न झाला. त्यावेळी उदघाटकीय भाषणातून ते बोलत होते. श्री शाहू फुले आंबेडकर समाज सेवा समिती नांदुरा चे वतीने आयोजित या परिचय मेळाव्याच्या अध्यक्ष स्थानी जिल्हा परिषद बांधकाम सभापती राजेंद्र उमाळे होते. उदघाटक म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे विचाराचे प्रमुख खंदे प्रचार व प्रसारक आचार्य वेरुळकर गुरुजी, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष तथा आमदार चैनसुख संचेती , खामगाव चे आमदार अॅड. आकाश फुंडकर , बाळापूरचे आमदार बळीराम सिरस्कार, खामगाव प स सभापती सौ उर्मिलाताई गायकी, भाजप जिल्हा महामंत्री विश्वनाथ माळी, खामगाव तालुकाध्यक्ष शरदचंद्र गायकी, जि प सदस्य पुंडलिकभाऊ बोंबटकार, प स सदस्य रामेश्वर बंड, जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ, परिचय मेळावा आयोजन प्रमुख निवृत्ती हरिभाऊ इंगळे आदी मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती. या परिचय मेळाव्याची सुरवात श्री संत सावता माळी, क्रांतिसूर्य महात्मा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमेचे पूजन आमदार अॅड. आकाश फुंडकर व उपस्थित प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करून करण्यात आली. यावेळी शेकडो युवक युवतींनी आपला परिचय दिला. या मेळाव्याला राज्यातील हजारो माळी समाज बांधव उपस्थित होते.
परिचय मेळाव्यातून समाजाचे एकत्रिकरण : आकाश फुंडकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 15:21 IST
नांदुरा: परिचय मेळाव्यातून वेळ व पैसा तर वाचतोच शिवाय समाजाचे एकत्रीकरण होते, असे प्रतिपादन आमदार अॅड. आकाश फुंडकर यांनी केले.
परिचय मेळाव्यातून समाजाचे एकत्रिकरण : आकाश फुंडकर
ठळक मुद्देनांदुरा येथे 2 डिसेंबर रोजी माळी समाज राज्यस्तरीय युवक युवती परिचय मेळावा संपन्न झाला.यावेळी शेकडो युवक युवतींनी आपला परिचय दिला.या मेळाव्याला राज्यातील हजारो माळी समाज बांधव उपस्थित होते.