बंदीनंतरही दारुविक्री सुरुच
By Admin | Updated: July 3, 2014 23:00 IST2014-07-03T21:15:45+5:302014-07-03T23:00:58+5:30
ग्रामसभा घेवून दारुबंदी करण्यात आली. मात्र गावात अवैध दारुविक्री सुरुच आहे.

बंदीनंतरही दारुविक्री सुरुच
दुधा : बुलडाणा तालुक्यातील दूधा येथे ग्रामसभा घेवून दारुबंदी करण्यात आली. मात्र असे असतांनाही गावात अवैध दारुविक्री सुरुच आहे. यामुळे गावातील सामाजिक वातावरण दुषीत झाले आहे. याबाबत गावातील महिलांनी पुढकार घेवून गावात दारुबंदीसाठी प्रशासनाकडे धाव घेत, जिल्हा पोलिस अधिक्षक यांना निवेदन दिले.
दारुचे दुष्षपरिणाम लक्षा घेत, गत महिण्यात ग्रामसभा घेवून गावात दारुबंदीचा एकमुखाने ठराव घेण्यात आला. यानंतरही गावात दारुची छुप्यापद्धतीने विक्री सुरुच आहे. याबाबत ग्रामस्थांनी धाड पोलिसांनी वारंवार विनंती केली. मात्र त्याचा फायदा झाला नाही. यामुळे गावातील ग्रामपंचायत पदाधिकारी आणि महिलांनी जिल्हा पोलिस अधिक्षक यांना आपल्या मागणीचे निवेदन दिले. यावेळी सरपंच प्रमोद सोनूने, तंटामुक्ती अध्यक्ष विष्णू चव्हान, दारुबंदी समितीच्या अध्यक्ष आशाबाई सरडे, सुशिलाबाई सोनूने, प्रमिला गवई, प्रमोद सरडे, एकनाथ सोनूने, देवेंद्र गवई यांच्यासह गावातील महिला उपस्थित होत्या.