महिलांच्या सहकार्याने दारु विक्रेत्यांवर कारवाई
By Admin | Updated: June 2, 2014 00:35 IST2014-06-02T00:25:38+5:302014-06-02T00:35:04+5:30
भडगाव येथे महिलांच्या सहकार्याने गावातील सहा दारुविक्रेत्याच्या घरी धाडी टाकून दारुसाठा जप्त.

महिलांच्या सहकार्याने दारु विक्रेत्यांवर कारवाई
भडगाव : जिल्हा पोलिस उपअधिक्षक शेख व रायपुरचे ठाणेदार गावंडे यांनी दारुबंदी महिला समितीच्या सहकार्याने गावातील सहा दारुविक्रेत्याच्या घरी धाडी टाकून हजारो रुपयाचा दारुसाठा जप्त केली. दारुबंदीसाठी गावात ग्रामसभा घेण्यात आली. यामध्ये ग्रामस्थांच्या उपस्थित दारुबंदी महिला समितीचे सदस्य यांनी गावातील अवैध दारु विक्रेत्यांना दुकाने बंद करण्याचे आदेश देण्यात आले. मात्र तरीही गावात दारुचे दुकाने सुरु होते. यामुळे गावातील सामाजिक वातावरण दुषित होत होते. याबाबत दारुबंदी महिला समितीच्या सदस्यांनी जिल्हा उपपोलिस अधिक्षक समीर शेख यांना फोनवर माहिती दिली. याची दखल घेत जिल्हा उपपोलिस अधिक्षक यांनी आपल्या पथकासह भडगाव गाठले. यावेळी गावातील महीलांनी पुढाकार घेतला.