विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:33 IST2021-04-25T04:33:54+5:302021-04-25T04:33:54+5:30

रस्त्यांची दुरवस्था लाेणार : ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून, वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. खड्डे चुकविण्याच्या ...

Action is being taken against those who move without any reason | विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई सुरू

विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई सुरू

रस्त्यांची दुरवस्था

लाेणार : ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून, वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात अनेक वेळा अपघात हाेत असल्याचे चित्र आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी हाेत आहे़

काेराेनाबाधितांची संख्या वाढली

धामणगाव बढे: परिसरात काेराेनाबाधितांची संख्या जानेवारी, फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत वाढली आहे. त्यामुळे प्रशासनावर ताण वाढत आहे. संचारबंदी असतानाही अनेक जण विनाकारण फिरत असल्याने काेराेना संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त हाेत आहे़

शासकीय कार्यालयातील दूरध्वनी सुरू करा

बुलडाणा : तालुक्यातील शासकीय कार्यालयातील दूरध्वनी सुरू करावे, सात दिवसांच्या आत दूरध्वनी सुरू न झाल्यास १५ एप्रिल रोजी आंदोलन करू, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे़

कांदा काढणीच्या मजुरीत वाढ

मेहकर : तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांदा पिकांची लागवड केली आहे. सध्या कांदा काढणीला आला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी काढणीचे दर वाढले आहेत. त्यातच भावही कमी मिळत असल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत़

लसीकरणासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा

बुलडाणा : कोरोना या संसर्गजन्य आजारामुळे वर्षभरापासून सगळे त्रस्त आहेत. यावर लसीकरण हा प्रभावी प्रतिबंधात्मक उपचार असून, कोविड लसीकरणासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन आराेग्य विभागाने केले आहे.

कोरोनाचा कर वसुलीवर परिणाम

बुलडाणा : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचा पालिकेच्या कर वसुलीवर परिणाम झाला आहे. प्रशासनाने निर्बंध लावल्याने अनेक दुकाने मोजक्याच वेळेत सुरू आहेत. यामुळे नुकसान होत असल्याने अनेकांनी कर भरलाच नसल्याचे दिसून येत आहे.

व्हायरल फिव्हरची साथ, ग्रामस्थ त्रस्त

बिबी : वातावरणातील बदलामुळे व्हायरल फिव्हरची साथ सुरू आहे. अनेकांना सर्दी, ताप, खाेकल्याचा त्रास हाेत आहे. काेराेनाची हीच लक्षणे असल्याने ग्रामस्थांनी धास्ती घेतल्याचे चित्र बिबी परिसरातील अनेक गावांमध्ये आहे.

पीक विम्याचा लाभ देण्याची मागणी

सिंदखेड राजा : जिल्ह्याची आणेवारी ५० पैशांच्या आत असूनही शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळालेला नाही. तक्रार केलेल्या शेतकऱ्यांनाच लाभ मिळाला आहे. त्यामुळे पीक विम्याचा सरसकट लाभ देण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे़

लाॅकडाऊनमुळे रसवंती संचालक संकटात

सुलतानपूर : दरवर्षी उन्हाळ्यात रसवंतीचालकांचा चांगला व्यवसाय हाेत हाेता़; मात्र मार्च महिन्यापासूनच काेराेनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे निर्बंध लादण्यात आले आहेत़ त्यामुळे रसवंती संचालक आर्थिक संकटात सापडल्याचे चित्र आहे़

Web Title: Action is being taken against those who move without any reason