दोन सराफा व्यावसाईकांचा परस्परांवर अॅसिड हल्ला; चौघे जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 15:43 IST2019-05-18T15:41:13+5:302019-05-18T15:43:18+5:30
संग्रामपूर : तालुक्यातील टुनकी येथे दोन सराफाव्यावसाईकांमध्ये शनिवारी दुपारी ग्राहक वळविल्याच्या कारणावरून वाद झाला. यात एकमेकांवर अॅॅसिड फेकण्यात आल्याने चौघे जण जखमी झाले.

दोन सराफा व्यावसाईकांचा परस्परांवर अॅसिड हल्ला; चौघे जखमी
संग्रामपूर : तालुक्यातील टुनकी येथे दोन सराफाव्यावसाईकांमध्ये शनिवारी दुपारी ग्राहक वळविल्याच्या कारणावरून वाद झाला. यात एकमेकांवर अॅॅसिड फेकण्यात आल्याने चौघे जण जखमी झाले.
टुनकी ता. संग्रामपूर येथे गावात सराफा व्यवसाय करणारे संजय शिंगणापुरे, शुभम शिंगणापुरे आणि सुधीर पिंजरकर, राहूल पिंजरकर यांच्यात ग्राहक वळविल्याच्या कारणावरून शनिवारी दुपारी २ वाजता वाद झाला. या वादाचे पर्यवसन हाणामारीत झाले. यावेळी दोन्ही गटाकडील मंडळी आमने-सामने आली. भांडणादरम्यान एकमेकांच्या अंगावर अॅसिड फेकण्यात आले. यात संजय शिंगणापुरे यांचा हात भाजला असून एकूण चारही जण जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच तामगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमी झालेल्या चौघांनाही वैद्यकीय उपचारासाठी शेगाव येथे सईबाई मोटे उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मेडिकल रिपोर्टवरून पोलीस कारवाई करण्यात येणार आहे. (तालुका प्रतिनिधी)