महिलेला अश्लील शिवीगाळ, एक महिना आरोपीला जेलची हवा

By अनिल गवई | Updated: May 18, 2024 17:46 IST2024-05-18T17:46:22+5:302024-05-18T17:46:39+5:30

खामगाव: महिलेस अश्लील शिविगाळ करणार्या एकास न्यायालयाने एक महिना साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. खामगाव येथील कोर्ट क्रमांक २ चे ...

Accused should be jailed for one month for obscenely abusing a woman in khamgaon | महिलेला अश्लील शिवीगाळ, एक महिना आरोपीला जेलची हवा

महिलेला अश्लील शिवीगाळ, एक महिना आरोपीला जेलची हवा

खामगाव: महिलेस अश्लील शिविगाळ करणार्या एकास न्यायालयाने एक महिना साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. खामगाव येथील कोर्ट क्रमांक २ चे न्यायाधीश ओंकार साने यांनी हा महत्वपूर्ण निकाल दिला.

घटनेची हकिकत अशी की, खामगाव तालुक्यातील राहूड येथील एक विवाहिता २२ मे २०१८ रोजी शेतात कामाला गेली होती. त्यावेळी तिच्या शेताच्या धुर्यावरील झाड तोडण्यासाठी आलेल्या इसमाला हटकले असता संशयित विनोद देविदास देवळे ४४ आणि राजेश देविदास देवळे ३१ यांनी अश्लील शिविगाळ करून दोघांनीही लोटपाट केली.

जीवे मारण्याची धमकी देत शेताचा रस्ता बंद करण्याचा दम दिल्याची तक्रार पिंपळगाव राजा पोलिसांत दिली. या तक्रारीवरून पोलीसांनी दोघांविरोधात भादंवि कलम ३२३, २९४, ५०६, ३४ नुसार गुन्हा दाखल केला. चौकशीअंती पोलीसांनी दोषारोपपत्र खामगाव येथील न्यायालयात दाखल केले. आरोप सिध्द करताना न्यायालयाने चार साक्षीदार तपासले. अभियोग पक्षाच्यावतीने विशेष सहा. सरकारी अभियोक्ता अजय इंगळे यांचा युक्तीवाद ग्राह्य मानून कोर्ट क्रमांक २ चे न्यायाधीश ओंकार साने यांनी संशयित विनोद देवळे याला भादंवि कलम २९४, ३२३, ५०६ मध्ये दोषी ठरवून प्रत्येक कलमानुसार १ महिना साधा कारावास व एक हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाची तीन हजार रूपये रक्कम नुकसान भरपाई म्हणून तक्रारदार महिलेस देण्याचा आदेश शुक्रवारी दिला.

Web Title: Accused should be jailed for one month for obscenely abusing a woman in khamgaon