खून प्रकरणातील आरोपींना कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 01:22 IST2017-11-14T01:15:44+5:302017-11-14T01:22:01+5:30

मोताळा : युवकाचे अपहरण करून खून केल्याप्रकरणी पोलीस कोठडीत असलेल्या चौघा आरोपींना सोमवारी पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता, त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.

The accused in murder case | खून प्रकरणातील आरोपींना कोठडी

खून प्रकरणातील आरोपींना कोठडी

ठळक मुद्देयुवकाचे अपहरण करून खून केल्याप्रकरणी कोठडीत रवानगी

लोकमत न्यूज नेटवर्क
मोताळा : युवकाचे अपहरण करून खून केल्याप्रकरणी पोलीस कोठडीत असलेल्या चौघा आरोपींना सोमवारी पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता, त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.
अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून जालना जिल्ह्यातील पद्मावती येथील प्रवीण सुभाष बेलम याचे तळणी शिवारातून अपहरण झाले होते. सिल्लोडमधील घाटनांद्रा शिवारात त्याचा मृतदेह अपहरणकर्त्यांनी फेकला होता. बोराखेडी पोलिसांनी दयानंद माणिक शेवाळे (३५), शरद दिलीप पवार (२२), उषाबाई दयानंद शेवाळे (२५), विनोद पांडुरंग पवार (सर्व रा. पद्मावती, जालना) यांना अटक केली होती. त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. सोमवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. पुढील तपास ठाणेदार अविनाश भामरे करीत आहेत.

Web Title: The accused in murder case