कोरोना काळात लाल मिरचीने दिली शेतकऱ्यांना साथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 11:10 IST2021-04-07T11:09:29+5:302021-04-07T11:10:14+5:30
Agriculture News : या संकटात शेतकºयांना लाल मिरचीने साथ दिल्याचे शेगाव परिसरात दिसत आहे.

कोरोना काळात लाल मिरचीने दिली शेतकऱ्यांना साथ
लोकमत न्यूज नेटवर्क
शेगाव : कोरोना काळात भाजीपाल्याचे भाव गडगडल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. अशातच मिरची उत्पादक शेतकºयांनी मिरची शेतातच पिकू देऊन लाल मिरचीचे उत्पन्न घेणे सुरू केले. त्यामुळे या संकटात शेतकºयांना लाल मिरचीने साथ दिल्याचे शेगाव परिसरात दिसत आहे.
दरवर्षी शेतकरी आपल्या सोयीने बाजारपेठेचा अभ्यास करून पीक घेतात. प्रचंड परिश्रम घेऊन शेतात लागवड करतात. मात्र नैसर्गिक प्रकोप शेतकºयांच्या पाचवीला पूजलेला असतो. गतवर्षी मार्च महिन्यापासून कोरोनाचे संकट घोंघावत आहे. यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. यावषीर्ही तसेच कोरोनाचे संकट पुन्हा घोंघावत आहे. तालुकास्तरावरच्या बाजारपेठा प्रभावित झाल्या आहेत. भाजीपाला बाहेर जाणे थांबले आहे. त्यामुळे भाजीपाल्याचे दर गडगडले. नाईलाजाने शेतकºयांना दोन ते चार रुपये किलोने वांगे, टोमॅटो विकावे लागले. पानकोबी, फुलकोबी तर एक रुपयाला विकण्याची वेळ आली. मात्र तालुक्यातील शेतकºयांना लाल मिरचीने साथ दिली. ३० रुपये किलो असलेला दर १५ रुपये किलोपर्यंत घसरल्याने शेतकºयांनी मिरची न तोडण्याचा निर्णय केला. तो फायद्याचा ठरला. साडेतीन किलो हिरव्या मिरचीचे एक किलो लाल मिरचीएवढे वजन भरते. लाल मिरचीचे दर सध्या १४० रुपये प्रती किलो आहे. दराचा विचार केल्यास शेतकन्यांना यातून बºयापैकी उत्पन्न मिळत आहे.
महिला मजुरांना मिळाले काम
n मिरची तोडण्यासाठी महिला मजुरांची आवश्यकता असते. त्यामुळे परिसरातील शेकडो हातांना काम मिळाले आहे. आतापासून पाच किलो, दहा किलो मिरचीची मागणी सुरू झाली आहे.
n किमान पाच ते सात क्विंटल मिरची स्थानिक ग्राहकांना विकली जाणार आहे. त्यामुळे वाहतूक खर्च वाचणार असून ग्राहकांनाही ती कमी किमतीत मिळेल.