Accident: अज्ञात वाहनाच्या धडकेत युवकाच मृत्यू, दोन जखमी
By ब्रह्मानंद जाधव | Updated: October 2, 2022 16:15 IST2022-10-02T16:15:25+5:302022-10-02T16:15:43+5:30
Accident: अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील युवक ठार व इतर दोन जण जखमी झाल्याची घटना येथील कुंभारी फाट्यानजीक शनिवारी सायंकाळी घडली.

Accident: अज्ञात वाहनाच्या धडकेत युवकाच मृत्यू, दोन जखमी
- ब्रह्मानंद जाधव
देऊळगाव राजा : अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील युवक ठार व इतर दोन जण जखमी झाल्याची घटना येथील कुंभारी फाट्यानजीक शनिवारी सायंकाळी घडली.
तालुक्यातील दगडवाडी येथील रंगनाथ आत्माराम हिवाळे, चंद्रमणी उत्तम काकडे व रोशनी रंगनाथ हिवाळे हे तिघे देऊळगाव राजा येथून दगडवाडी येथे घराकडे दुचाकी (क्रमांक एम. एच. २८ के ७२२८)ने जात होते. कुंभारी फाट्यानजीक चिखली मार्गावर एका अज्ञात कारने त्यांच्या दुचाकीस जबर धडक दिली. या अपघातात चंद्रमणी उत्तम काकडे (वय ३०) हे जागीच ठार झाले. तर रंगनाथ हिवाळे (वय ३२) रोशनी रंगनाथ हिवाळे (वय १२) हे गंभीर जखमी झाले. रंगनाथ हिवाळे यांच्यावर देऊळगाव राजा ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करण्यात आले. परंतू त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना जालना येथे हलविण्यात आले.