इज्तेमावरून परतणाऱ्या वाहनाला अपघात; एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 12:40 IST2019-12-11T12:40:03+5:302019-12-11T12:40:37+5:30

खामगाव नजीक असलेल्या मोठ्या हनुमान मंदिराजवळ या भाविकांच्या वाहनाला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली.

Accident a vehicle returning from Iztema; One killed | इज्तेमावरून परतणाऱ्या वाहनाला अपघात; एक ठार

इज्तेमावरून परतणाऱ्या वाहनाला अपघात; एक ठार

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: अमरावती येथे पार पडलेल्या मुस्लीम बांधवांच्या इज्तेमावरुन परतत असतांना भाविकांच्या प्रवासी वाहनाला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. यात १ जण ठार झाला असून १२ जण जखमी झाले आहेत. ही दुर्घटना मंगळवारी पहाटे अकोला महामार्गावरील मोठ्या हनुमान मंदिरानजीक घडली.
मुस्लीम समाजाचा सर्वात मोठा राज्यस्तरीय आलमी इन्तेमा अमरावती येथे आयोजित करण्यात आला होता. यामध्ये अमरावती विभागासह नागपूर येथील मुस्लिम समाज बांधव मोठ्यासंख्येने सहभागी झाले होते. यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील मुस्लिम समाज बांधवही सहभागी झाले होते. दरम्यान, अमरावती येथील इज्तेमाचा सोमवारी सामूहीक दुवा (प्रार्थना) नंतर समारोप झाला. त्यानंतर चिखली येथील भाविक एमएच २८ एबी-२८४३ या प्रवासी वाहनाने अकोला मार्गे चिखलीकडे परतत होते. दरम्यान, खामगाव नजीक असलेल्या मोठ्या हनुमान मंदिराजवळ या भाविकांच्या वाहनाला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. यात प्रवासी वाहनाचा चालक मो.शारीक शे. उमर (४२) रा. गौरक्षण रोड वाडी ता. चिखली याचा जागीच मृत्यू झाला. तर सदाम शाह, मेहबुब शाह (२८) शे. रेहान शे. सादीक (१६), शे. आसीफ शे. हसन, रफिक मनीयार, शे. रहीम शे, बादशाह (३६), फरदिन शे. रफीक (१५), शे. फैजान शे. शारीक (१८), इजहान अहमद (११) यांना उपचारार्थ खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती अत्यवस्थ झाल्याने शेख साहिल आणि शेख फैजान यांना खामगाव येथील एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. तर शेख रफिक शेख मन्नु आणि शेख आसिफ शेख हसन यांना औरंगाबाद येथे हलविण्यात आले. याप्रकरणी शे.शकील शे. मिया रा. साखरखेर्डा यांच्या तक्रारीवरुन ग्रामीण पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध कलम २७९, ३०४ (अ), ३३७, ४२७ भादंवि सह कलम १३४ मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
 

Web Title: Accident a vehicle returning from Iztema; One killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.