प्रवासी बस व मालवाहू ॲपेचा अपघात; एक जण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 11:46 AM2021-03-14T11:46:37+5:302021-03-14T11:46:47+5:30

Accident News चिखली-अमडापूर मार्गावर पेठनजीक खासगी प्रवासी बस व मालवाहू ॲपेचा अपघात होऊन ॲपे चालकाचा मृत्यू झाला.

Accident of passenger bus and freight app; One killed | प्रवासी बस व मालवाहू ॲपेचा अपघात; एक जण ठार

प्रवासी बस व मालवाहू ॲपेचा अपघात; एक जण ठार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली/अमडापूर : चिखली-अमडापूर मार्गावर पेठनजीक खासगी प्रवासी बस व मालवाहू ॲपेचा अपघात होऊन ॲपे चालकाचा मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडला.
अमडापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत १३ मार्च रोजी हा अपघात झाला. खासगी बसची जबर धडक मालवाहू ॲपेला बसल्याने त्यात ॲपे चालक किशोर गजानन इंगळे हे जागीच ठार झाले.  शनिवारी सकाळी उत्रादा येथील २३ वर्षीय किशोर गजानन इंगळे हे मालवाहू ॲपे घेऊन (एमएच-२८-एच-८३१९) पेठ येथील रोडवर येत असताना चिखलीकडून येणाऱ्या खासगी प्रवासी बसची (एमएच-१२-एसएफ-७०११) ॲपेला जबर धडक बसली. त्यात ॲपेचालक किशोर गजानन इंगळे यांचा जागीच मृत्यू झाला. ही बस चिखलीकडून खामगावकडे जात होती. प्रकरणी बिदेसिंग भारतसिंग इंगळे (३८, रा. उत्रादा) यांनी खासगी बस चालकाविरोधात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास अमडापूर पोलीस करीत आहेत.

Web Title: Accident of passenger bus and freight app; One killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.