समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 12:28 IST2025-04-28T12:28:08+5:302025-04-28T12:28:50+5:30

समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात आयशर वाहनाच्या चालकाचा जागीच मृत्यू झाला. गणेश गायकवाड मयताचे नाव असून, तो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बिडकिनचा रहिवासी आहे.

Accident on Samruddhi Highway, Eicher vehicle hits pole! Driver from Sambhajinagar killed, colleague injured | समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी

समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी

बुलढाणा : समृद्धी महामार्गावरील नागपूर कॉरिडोरच्या चेन क्रमांक ३१७.३ भागात (दुसरबीड, जि. बुलढाणा) २८ एप्रिल रोजी पहाटे २:२० वाजता भीषण अपघात झाला. या अपघातात आयशर वाहनाचा (क्रमांक एमएच २० ईजी ५०१५) चालक गणेश गायकवाड (वय अंदाजे ४०, रा. बिडकिन, जि. छत्रपती संभाजीनगर) यांचा जागीच मृत्यू झाला.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

मयत चालकासोबत प्रवास करणारे मच्छिंद्र क्षीरसागर (रा. पांग्रा, जि. छत्रपती संभाजीनगर) जखमी झाले आहेत. 

वाचा >>अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं

रात्री गस्तीवर असलेल्या दुसरबीड उपकेंद्राच्या पोलिसांना छत्रपती संभाजीनगर सीआरओकडून अपघाताची माहिती मिळाल्यावर पोलीस उपनिरीक्षक शैलेश पवार, हेडकॉन्स्टेबल रोशन, किरके आणि भुतेकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. 

का झाला अपघात, प्राथमिक तपासात काय आढळले?

प्रारंभिक तपासात चालकाला झोप लागल्याने वाहनावरील नियंत्रण सुटल्याचे समोर आले आहे. मृत व जखमींना सरकारी रुग्णवाहिकेद्वारे ग्रामीण रुग्णालय, दुसरबीड येथे हलवण्यात आले आहे. दरम्यान, अपघातानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली असून, पुढील तपास किनगाव राजा पोलिस ठाणे करीत आहे.

Web Title: Accident on Samruddhi Highway, Eicher vehicle hits pole! Driver from Sambhajinagar killed, colleague injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.