स्टेअरींग रॉड तुटल्याने बसला अपघात; सहा प्रवाशी थोडक्यात बचावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 18:02 IST2021-03-20T18:00:21+5:302021-03-20T18:02:25+5:30
Accident due to broken steering rod बुलडाणा-सैलानी मार्गावर सागवनच्या नदीनजीक पुलाजवळ हा अपघात घडला.

स्टेअरींग रॉड तुटल्याने बसला अपघात; सहा प्रवाशी थोडक्यात बचावले
बुलडाणा: राज्य परिहवन महामंडळाच्या बुलडाणा आगाराच्या बुलडाणा-सैलानी या बसचा स्टेअरिंग रॉड तुटल्याने बसला अपघात झाला. सुदैवाने या अपघातामध्ये कुठलीही जिवीत हानी झाली आहे. बसमधील सर्व सहाही प्रवाशी सुखरूप आहेत.
हा अपघात शनिवारी सकाळी ६.४५ वाजेच्या सुमारास घडली. सुदैवाने वाहन चालकाने अशाही स्थितीत वाहनावर नियंत्रण मिळविल्याने मोठा अपघात टळला. बुलडाणा-सैलानी मार्गावर सागवनच्या नदीनजीक पुलाजवळ हा अपघात घटला. बुलडाणा आगारातून सकाळी ६:३० वाजेच्या दरम्यान एमएच-४०-एन-८४८८ क्रमांकाची एसटीबस सैलानीसाठी निघाली होती. दरम्यान सागवन गावानजीक या बसचा स्टेअरिंग रॉड तुटल्याने बस अनियंत्रीत झाली व पैनगंगा नदी नजीकच्या पुलाच्या कठड्याला ती थाडली. यावेळी पांग्री येथील चालक गजानन उबरहंडे यांनी अशाही परिस्थितीत बसच्या वेगावर नियंत्रण मिळवल्याने मोठी दुर्घटना टळली. या अपघाता बस चालक, वाहक आणि बसमधील सहा प्रवाशी सुखरूप असल्याचे सुत्रांनी सांगितले. मात्र बसचे यात मोठे नुकसान झाले आहे.