शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

दहा हजाराची लाच स्वीकारताना वनपाल रंगेहात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2018 19:45 IST

जप्त केलेला लाकडाचा ट्रक सोडण्यासाठी १० हजाराची लाच स्वीकारणाºया वनपालास चिखली तालुक्यातील एकलारा फाट्याजवळ रंगेहात पकडल्याची कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने २० एप्रिल रोजी दुपारी २ वाजेदरम्यान केली.

बुलडाणा - जप्त केलेला लाकडाचा ट्रक सोडण्यासाठी १० हजाराची लाच स्वीकारणाºया वनपालास चिखली तालुक्यातील एकलारा फाट्याजवळ रंगेहात पकडल्याची कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने २० एप्रिल रोजी दुपारी २ वाजेदरम्यान केली. मेहकर तालुक्यातील डोणगाव येथील ३७ वर्षिय तक्रारकर्ते यांनी बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली की, जप्त केलेला लाकडाचा ट्रकसोडण्यासाठी आरोपी वनपाल पुरूषोत्तम बुटे यांने २० हजाराची लाच मागितली होती. मात्र तडजोडीनंतर १० हजार देण्याचे ठरल्याचे तक्रारीत नमूद केले होते. या तक्रारीच्या आधारे बुलडाणा लाच लुचपत विभागाचे अमरावती येथील पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, बुलडाणा येथील पोलिस उपअधिक्षक, शैलेश प्र. जाधव  यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक प्रवीण खंडारे, पथकातील कर्मचारी राजू जंवजाळ, प्रदिप गडाख, दिपक लेकुरवाळे, विनोद लोखंडे, जगदीश पवार, निलेश सोळंकी चालक समीर शेख यांनी चिखली तालुक्यातील एकलारा फाट्याजवळ सापळा रचला. यावेळी बुलडाणा येथील जुना गावातील रहिवासी वनपालपुरूषोत्तम  माधवराव बुटे (वय ५७) याने  लाचेची मागणी करून दहा हजार रुपये रोख रक्कम स्वीकारत असताना पंचासमक्ष रंगेहात पकडण्यात आले. यावेळी आरोपीकडून १० हजार रूपये जप्त करण्यात आले. तसेच कलम ७, १३, (१)(ड) सह १३ (२) लाच लुचपत प्रतिबंधक कायदा सन २०८८ गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.

टॅग्स :Crimeगुन्हाforestजंगल