जादूटोण्याच्या संशयावरुन शेगावात पुजार्‍याचे अपहरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 02:27 IST2017-10-12T02:27:09+5:302017-10-12T02:27:14+5:30

शेगाव (बुलडाणा) : जादूटोणा केल्याच्या संशयावरून बुधवारी येथील एका मंदिराच्या पुजार्‍याचे अपहरण करून त्याला बेदम मारहाण करण्यात आली. पोलिसांनी वेळीच हालचाली करुन अपहृत पुजार्‍याची सुटका केली. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली असून चार जण फरार आहेत.

The abduction of the priest in Shiga | जादूटोण्याच्या संशयावरुन शेगावात पुजार्‍याचे अपहरण

जादूटोण्याच्या संशयावरुन शेगावात पुजार्‍याचे अपहरण

ठळक मुद्देदोघांना अटक; चार जण फरार

लोकमत न्यूज नेटवर्क
शेगाव (बुलडाणा) : जादूटोणा केल्याच्या संशयावरून बुधवारी येथील एका मंदिराच्या पुजार्‍याचे अपहरण करून त्याला बेदम मारहाण करण्यात आली. पोलिसांनी वेळीच हालचाली करुन अपहृत पुजार्‍याची सुटका केली. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली असून चार जण फरार आहेत.
येथील फारशीपुरा भागात असलेल्या सितलामाता मंदिरातील पुजारी श्रीकृष्ण रामदास बैरागी यांनी आपल्यावर जादूटोणा केल्याच्या संशयावरुन बुधवारी लोहारा (ता. बाळापूर) येथील येथील निलेश ठाकूर , बबलू ठाकूर यांनी शेगाव गाठले. माजी उपनगराध्यक्ष हाजी मंजूर अहेमद यांच्या मदतीने बैरागी यांचे घर शोधले व ऑटोमध्ये बसवून त्यांचे अपहरण करुन लोहारा येथे नेले. त्यानंतर एका ऑटोने अकोट तालुक्यातील पंचगव्हाण येथे एका धार्मिक स्थळावर नेऊन तूच आमच्यावर जादूटोणा केला, असे सांगून काठीने बेदम मारहाण केली. दरम्यान, पुजारी बैरागी यांच्या नातेवाईकांना शंका आल्याने त्यांनी पोलीस स्टेशनला धाव घेतली व घडलेला प्रकार सांगितला. पोलीसांनी तत्काळ तपासचक्रे फिरवून घटनास्थळ गाठले व पुजार्‍याची सुटका केली. 

Web Title: The abduction of the priest in Shiga