डाेणगावातील युवकाची गळफास लावून आत्महत्या
By संदीप वानखेडे | Updated: March 31, 2024 14:37 IST2024-03-31T14:37:00+5:302024-03-31T14:37:08+5:30
डाेणगाव येथील वार्ड क्रमांक दाेनमध्ये राहणाऱ्या माेहनसिंग दिनाेरे या युवकाने गाेठ्यातील टीन पत्राच्या लाेखंडी अँगलला दाेरी बांधून गळफास लावून घेतला.

डाेणगावातील युवकाची गळफास लावून आत्महत्या
डोणगाव : येथील ३३ वर्षीय युवकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना ३१ मार्च राेजी घडली. मोहनसिंग आनंदसिंह दिनोरे असे मृतक युवकाचे नाव आहे़
डाेणगाव येथील वार्ड क्रमांक दाेनमध्ये राहणाऱ्या माेहनसिंग दिनाेरे या युवकाने गाेठ्यातील टीन पत्राच्या लाेखंडी अँगलला दाेरी बांधून गळफास लावून घेतला. ही घटना ३१ मार्च राेजी उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच डोणगाव पोलिस स्टेशनचे नापोकॉ सतीश मुळे व ज्ञानेश्वर घायाळ यांनी घटना स्थळावर भेट देऊन पंचनामा केला. डाेणगाव पाेलिसांनी आकस्मिक मृत्यूंची नाेंद केली आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. गत काही दिवसांपासून डोणगावात युवकाच्या आत्महत्या वाढल्या आहेत.