विहिरीत आढळला महिलेचा मृतदेह; पोलिसांचा तपास सुरू
By विवेक चांदुरकर | Updated: August 25, 2023 19:43 IST2023-08-25T19:26:27+5:302023-08-25T19:43:38+5:30
पुढील तपास जळगाव जामोद ठाणेदार दिनेश झांबरे यांचा मार्गदर्शनात पोलीस करीत आहेत.

विहिरीत आढळला महिलेचा मृतदेह; पोलिसांचा तपास सुरू
जळगाव जामोद : शहरातील उदय कॉलनीमध्ये जाणाऱ्या रस्त्यालगतच्या विहिरीत २५ ऑगस्ट रोजी ५५ वर्षीय महिलेचा मृतदेह आढळला. स्थानिक नागरिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी काही नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला.
मृत महिला वाडी खुर्द येथील वेणु रामेश्वर पवार (वय ५५) आहे. घटनेचा पंचनामा जळगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अमोल पंडित व पोलीस कॉन्स्टेबल स्वप्निल मस्के यांनी केला. पुढील तपास जळगाव जामोद ठाणेदार दिनेश झांबरे यांचा मार्गदर्शनात पोलीस करीत आहेत. यावेळी येथील नागरिकांनी नगरपालिका प्रशासनाविषयी नाराजी व्यक्त करीत जळगाव शहरामध्ये सार्वजनिक विहिरी उघड्या असून त्यांच्यावर पालिका प्रशासनाने जाळी लावावी तसेच ज्या विहिरीमुळे नागरिकांच्या जीवाला धोका आहे अशा विहिरी बजवून टाकाव्या, अशी मागणी केली.