उभ्या बसवर धडकल्याने दुचाकी स्वाराचा मृत्यू

By अनिल गवई | Updated: July 16, 2023 17:42 IST2023-07-16T17:42:41+5:302023-07-16T17:42:53+5:30

खामगाव -बुलढाणा रोडवरील वाघळी फाट्यानजिकची घटना

A two-wheeler rider died after hitting a standing bus | उभ्या बसवर धडकल्याने दुचाकी स्वाराचा मृत्यू

उभ्या बसवर धडकल्याने दुचाकी स्वाराचा मृत्यू

खामगाव: प्रवासी उतरवण्यासाठी थांबलेल्या बसवर भरधाव दुचाकी धडकल्याने एक जण जागीच ठार झाला. रविवारी दुपारी १२:३० वाजता ही घटना खामगाव बुलढाणा रोडवरील वाघळी फाट्यानजिक घडली.

 याबाबत प्राथमिक माहिती अशी की, खामगाव आगाराची एम एच ४० एन ९८९६ क्रमांकाची एसटी बस कवडगाव येथून खामगावकडे येत होती. वाघळी फाटा नजीक प्रवासी उतरवण्यासाठी ही बस थांबली होती. त्यावेळी पाठीमागून एम एच १२ एफ टी ९९६३ या दुचाकीचा चालक वाहनासह बसवर पाठीमागून धडकला.

ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकी वरील युवकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अनिल विष्णू राठोड रा. रेल धारेल जि. अकोला असे मृतकाचे नाव असल्याचे समजते. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. घटना स्थळावरचा पंचनामा करून युवकाचा मृतदेह शविच्छेदनासाठी खामगाव येथील सामान्य रुग्णालयात देण्यात आला.

Web Title: A two-wheeler rider died after hitting a standing bus