समृद्धीवर खासगी बसला कारची पाठीमागून धडक, सात जखमी

By निलेश जोशी | Updated: February 26, 2024 19:45 IST2024-02-26T19:44:56+5:302024-02-26T19:45:01+5:30

हा अपघातात २६ फेब्रुवारी रोजी पहाटे दोन वाजेच्या सुमारास घडला.

A private bus collided with a car from behind on Samriddhi, seven injured | समृद्धीवर खासगी बसला कारची पाठीमागून धडक, सात जखमी

समृद्धीवर खासगी बसला कारची पाठीमागून धडक, सात जखमी

दुसरबीड: समृद्धी महामार्गावर खासगी प्रवाशी बसला पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्या एका कारने जबर धडक दिली. त्यामध्ये कारमधील सात जण किरकोळ जखमी झाले आहेत. हा अपघातात २६ फेब्रुवारी रोजी पहाटे दोन वाजेच्या सुमारास घडला.

यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की, एमएच-१२-एसवाय-६३३१ क्रमांकाच्या कारद्वारे चालक अक्षय वायकर (३०, रा. कराड) हा अमरावती वरून कराड येथे जात होता. दरम्यान त्यांचे वाहनावरील नियंत्रण सुटून त्याचे वाहन खासगी प्रवाशी बस एमएच-४९-बीएल-३७८६ वर धडकली. त्यानतंर रोडच्यामधील बॅरिअरला धडकून हा अपघात झाला.

या अपघातामध्ये चालक अक्षय वायकर (३०), अमोल प्रमोद गुंड (३२), प्रतीक अविनाश वाव्हळ (३३), योगेश नंदू सोनुने (३७), नीलेश आनंद नेटे (३५), सचिन अशोक माने (३४), सार्थक संजय भारती (३२, सर्व रा. कराड) हे सात जण किरकोळ जखमी झाले. त्यांना बिबी येथील शासकीय रुग्णायात रुग्णवाहिकेद्वारे उपचारासाठी पाठविम्यात आले. तेथे त्यांच्यावर प्रथमोपचार करण्यात आले.

अपघातानंतर क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहन रस्त्याच्या बाजूला घेण्यात येऊन वाहतूक सुरळीत करण्यात आली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक शैलेश पवार यांनी दिली.

Web Title: A private bus collided with a car from behind on Samriddhi, seven injured

टॅग्स :Accidentअपघात