मित्राने केला मित्रावर अनैसर्गिक अत्याचार

By सदानंद सिरसाट | Updated: April 7, 2024 17:43 IST2024-04-07T17:43:18+5:302024-04-07T17:43:33+5:30

पीडित युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न

A friend committed unnatural violence on a friend | मित्राने केला मित्रावर अनैसर्गिक अत्याचार

मित्राने केला मित्रावर अनैसर्गिक अत्याचार

जळगाव जामोद (बुलढाणा) : तालुक्यातील एका गावातील युवकाने मित्रासोबत अनैसर्गिक कृत्य केल्याची तक्रार जळगाव जामोद पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. या प्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, तालुक्यातील एका गावातील २३ वर्षीय युवकावर त्याचा मित्र भगवान प्रमोद वाघ (२७) याने गेल्या वर्षभरापासून बळजबरीने अनैसर्गिक अत्याचार केल्याची तक्रार दाखल आहे. घटनेतील फिर्यादी व आरोपी दोघेही चांगले मित्र आहेत. आरोपीने वारंवार केलेल्या अत्याचाराला कंटाळून पीडित युवकाने अखेर विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. सध्या पीडित अकोला येथील सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची त्याची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. दरम्यान, जळगाव जामोद पोलिसांनी या प्रकरणी आरोपी भगवान प्रमोद वाघ याच्याविरुद्ध भादंवि कलम ३७७, सहकलम अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला. पुढील तपास मलकापूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी गवळी यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

Web Title: A friend committed unnatural violence on a friend