बुलडाणा जिल्ह्यात ९४.0३ टक्के बारावीचा निकाल

By Admin | Updated: June 4, 2014 00:42 IST2014-06-03T19:28:58+5:302014-06-04T00:42:35+5:30

बारावीचा निकाल : विभागात बुलडाणा दुसरा

9.03 percent of HSC result in Buldhana district | बुलडाणा जिल्ह्यात ९४.0३ टक्के बारावीचा निकाल

बुलडाणा जिल्ह्यात ९४.0३ टक्के बारावीचा निकाल

बुलडाणा : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या १२ वीचा परीक्षेचा निकाल आज दुपारी १ वाजता ऑनलाईन पध्दतीने जाहीर करण्यात आले असून यामध्ये बुलडाणा तालुक्याच्या निकालाची एकूण टक्केवारी ९४.0३ इतकी आहे. तालुक्यातील एकूण ३८ शाळा व माध्यमिक विद्यालयांपैकी झेड.पी.कनिष्ठ महाविद्यालय पाडळी, राजीव गांधी मिल्ट्री स्कुल, कोलवड, विवेकानंद उच्च माध्यमिक विद्यालय सव, सहकार ज्यु.कॉलेज धाड, राजर्षी शाहू ज्यु.कॉलेज दे.घाट, संत गाडगेबाबा ज्यु.कॉलेज साखळी शाळांचा १00 टक्के निकाल लागला आहे. बुलडाणा तालुक्यातून यावर्षी ३ हजार ४६९ विद्यार्थ्यांनी परिक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यात २0८३ मुले तर १0८६ मुली होत्या.परिक्षा देणार्‍या ३ हजार ४६५ विद्यार्थ्यांमध्ये २0८0 मुले तर १३८५ मुली होत्या. त्यापैकी ३२५८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यात १९१८ मुले तर १३४0 मुली आहेत. मुलांच्या पास होण्याची टक्केवारी ९२.५ असून मुलींची पास होण्याची टक्केवारी ९६.७५ आहे. अशा प्रकारे तालुक्याचा एकूण ९४.0३ टक्के निकाल लागला आहे. शाळा निहाय निकाल पुढीलप्रमाणे : झेड.पी.ज्युनिअर कॉलेज बुलडाणा ८५.३३, ङ्म्री शिवाजी ज्यु.कॉलेज बुलडाणा ९६.९८, जिजामाता कॉलेज बुलडाणा ८७.१३, झेड.पी.ज्यु.कॉलेज पाडळी १00, एडेड ज्यु.कॉलेज ९६.९१, प्रबोधन ज्यु.कॉलेज ९६.0६, शारदा ज्ञानपीठ ९३.९८, शिवाजी ज्यु.कॉलेज चांडोळ ९४.८३, झेड.पी.ज्यु.कॉलेज देऊळघाट ९४.२0, उर्दू ज्यु.कॉलेज बुलडाणा ८८.५२, जनता उच्च माध्यमिक स्कूल पिं.सराई ९८.२५, भारत विद्यालय बुलडाणा ९९.0४, विद्या विकास विद्यालय ९४.६४, ङ्म्री चक्रधर स्वामी विद्यालय मढ ९८.२८, संभाजी राजे ज्यु. कॉलेज डोंगरखंडाळा ९९.१७, शरद पवार विद्यालय पांगरी उबरहंडे ९४.७४, मौलाना आझाद उर्दू हायस्कूल धाड ९६.५५, शरद पवार ज्यु.कॉलेज वरूड ९९.३२, महात्मा ज्योतीबा फुले हायस्कूल ९३.१८, सहकार विद्या मंदिर बुलडाणा ९८.४८, भास्करराव शिंगणे विद्यालय चौथा ९0.३२, जिजामाता हायस्कूल दुधा ९४.0४, सरस्वती विद्यालय सुंदरखेड ९५.00, राजर्षी शाहू ज्यु.कॉलेज मासरूळ ९६.९१, राजर्षी शाहू ज्यु.कॉलेज धाड ९४.६४, राजीव गांधी मिल्ट्री स्कूल कोलवड १00, विवेकानंद उच्च माध्य.विद्यालय सव १00, राजे छत्रपती ज्यु.कॉलेज रामनगर ५३.३३, सहकार ज्यु.कॉलेज धाड १00, वंदे भारती ज्यु.कॉलेज धाड ९१.६७, महाराणा प्रताप ज्यु.कॉलेज धाड ९७.५0, आदिवासी आङ्म्रमशाळा येळगाव ९१.६९, राजर्षी शाहू ज्यु.कॉलेज दे.घाट १00, संत गाडगेबाबा ज्यु.कॉलेज साखळी १00, आर्ट, कॉर्मस कॉलेज रायपूर ५७.१४, उर्दू आर्ट स्कूल दे.घाट ७५.00, शरद पवार उर्दू हायस्कूल चांडोळ ८५.१९, राजर्षी शाहू महाराज ज्यु.कॉलेज माळविहिर ८७.१८

*** बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्याने यावर्षी सुद्धा बारावीच्या परीक्षेत अमरावती विभागात द्वितीय क्रमांक पटकावून आपला लौकिक कायम ठेवला आहे. जिल्ह्याच्या निकालात मुलींनी बाजी मारली असून, मुलींच्या उत्तीर्ण होण्याचे प्रमाण हे ९५.0७ टक्के एवढे आहे. बारावीच्या परीक्षेत बुलडाणा जिल्ह्यातील २३ हजार ८१८ विद्यार्थी नोंदविल्या गेले होते. प्रत्यक्षात २३ हजार ७९४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यामध्ये २२ हजार ६0 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, हा निकाल ९२.७१ टक्के एवढा लागला आहे. जिल्ह्यातील पुनर्परीक्षार्थींची संख्या २ हजार ९६ एवढी होती. त्यापैकी २ हजार २१ एवढय़ा विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. त्यापैकी ७६६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ही टक्केवारी ३७.९0 आहे. बारावीच्या निकालामध्ये १३ हजार ६0२ मुलांपैकी १२ हजार ३७0 विद्यार्थी पास झाले. तर १0 हजार १९२ मुलींपैकी तब्बल ९ हजार ६९0 मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलांचे उत्तीर्णतेचे प्रमाण ९0.९४ एवढे असून, मुलींची टक्केवारी ९५.0७ टक्के एवढी आहे. बुलडाणा, मोताळा, चिखली, देऊळगावराजा, सिंदखेडराजा, लोणार, मेहकर, खामगाव, शेगाव, नांदुरा, मलकापूर, जळगाव जामोद व संग्रामपूर या सर्वच तालुक्यांमध्ये मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण हे ९0 टक्क्यांपेक्षाही अधिक आहे. तर दुसरीकडे चिखली, खामगाव, शेगाव, नांदुरा, मलकापूर या तालुक्यातून ९0 टक्केपेक्षा कमी मुले उत्तीर्ण झाले आहेत. या निकालापेक्षाही नीट, पीएमटी पीईटीच्या निकालाची अनेकांना अधिक प्रतीक्षा आहे. निकल ऑनलाईन असल्यामुळे कोणत्याही शाळेत उत्साह दिसून आला नाही. तर आज जिल्हा बंद असल्यामुळे अनेक ठिकाणचे इंटरनेट कॅफे बंद होते. त्यामुळे काही विद्यार्थ्यांना निकालाची प्रत मिळाली नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थी नाराज दिसून आले. काहींनी मोबाईलद्वारे निकाल जाणून घेतला.

Web Title: 9.03 percent of HSC result in Buldhana district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.