जिल्ह्यात ९० बालके शाळाबाह्य आढळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:29 IST2021-07-25T04:29:04+5:302021-07-25T04:29:04+5:30
या विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्यात आला आहे़ काेराेनाची दुसरी लाट ओसरत असल्याने शासनाने काेराेनामुक्त गावांमध्ये इयत्ता ८ वी ते ...

जिल्ह्यात ९० बालके शाळाबाह्य आढळली
या विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्यात आला आहे़
काेराेनाची दुसरी लाट ओसरत असल्याने शासनाने काेराेनामुक्त गावांमध्ये इयत्ता ८ वी ते १२ वीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यास परवानगी दिली आहे़ इतर वर्ग ऑनलाइन सुरू आहेत़ मात्र, नेटवर्क नसल्याने व इतर कारणांमुळे ऑनलाइन शिक्षण ग्रामीण भागात कुचकामी ठरत आहे़ शिक्षण विभागाने विशेष माेहीम राबवून शाळाबाह्य मुलांचा शाेध घेतला हाेता़ यामध्ये जिल्हाभरात ९० बालके शाळाबाह्य आढळली आहेत़ शाळेत कधीही न गेलेले ६५ मुले आढळली़ यामध्ये ४१ मुले आणि २४ मुलींचा समावेश आहे़ तसेच अनुपस्थितीमुळे २५ मुले शाळाबाह्य ठरली आहेत़ यामध्ये १३ मुले आणि १२ मुलींचा समावेश आहे़
विद्यार्थ्यांना मिळाला प्रवेश
शिक्षण विभागाच्या वतीने विशेष माेहीम राबवून या विद्यार्थ्यांचा शाेध घेण्यात आला आहे़ या विद्यार्थ्यांना जवळच्या शाळेत प्रवेश देण्यात आला आहे़ बालमजुरीमुळे एक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिला आहे़ तसेच विशेष गरजाधिष्ठित असलेल्या बालकांची संख्या १४ आहे़