सातपुड्यात ७३ बारुद हातगोळे जप्त; एक आरोपी अटकेत दोन फरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 18:02 IST2020-02-11T18:01:57+5:302020-02-11T18:02:12+5:30
जप्त करण्यात आलेले हात गोळे रानडुकरांची शिकार करण्यासाठी येत असल्याची वन विभागाकडून देण्यात आली.

सातपुड्यात ७३ बारुद हातगोळे जप्त; एक आरोपी अटकेत दोन फरार
संग्रामपुर :- सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या आदिवासी ग्राम जुनी वसाडी येथे प्रादेशिक वनपरिक्षेत्र कार्यालय जळगाव जा. यांच्याकडून गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या धाडसी कार्यवाहीत 73 बारुद हात गोळे जप्त करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी एका आदिवासीला अटक करण्यात आली असून दोन फरार असल्याची माहिती प्रादेशिक वन विभागाकडून प्राप्त झाली आहे. जळगाव जा. येथील प्रादेशिक वनपरिक्षेत्र कार्यालयाला वसाडी येथे बारूद हातगोड्याच्या सहाय्याने रानडुकरांची शिकार करून मास विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली. या गुप्त माहितीच्या आधारे वनपरिक्षेत्र अधिकारी सलीम खान कर्मचाऱ्यांचा ताफा घेऊन वसाडी येथे धडकले. धाड टाकून 73 बारूद स्फोटक हातगोळे जप्त केले. या कार्यवाहीत कालू तेरसिंग अहिय्रा या आदिवासीला जुनी वसाडी येथून अटक करण्यात आली. तर यात सहभागी दोन आरोपी झाले आहे. ही कारवाई दि. 10 रोजी संध्याकाळी करण्यात आली. याप्रकरणी गुन्हा अ.प.क्र 738/08 भारतीय वन अधिनियम 1927 कलम 26(1) 5ह, 52(1) वन्य जीव संरक्षण अधिनियम 1972 चे कलम 9, 29, 32, 39(1) अ 5, 49,51 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. अटक करण्यात आलेल्या आरोपीला न्यायालयासमोर उभे केले असता दोन दिवसाची वन कोठडी सुनावली.स्फोटक पदार्थ जप्त करण्यात आल्याने आदिवासी भागात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. जप्त करण्यात आलेले हात गोळे रानडुकरांची शिकार करण्यासाठी येत असल्याची वन विभागाकडून देण्यात आली. मात्र जप्त करण्यात आलेले बारूद हातगोळे आले तरी कुठून या प्रश्नाचे उत्तर अध्यापही अनुत्तरीत आहे. त्यामुळे उलटसुलट चर्चांना वेग आला आहे.