शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वाभिमान’ अंतर्गत ७0 एकर शेती वाटप

By admin | Updated: June 6, 2015 00:53 IST

१८ लाभार्थ्यांना मिळणार लाभ; पुढील वर्षासाठी चार कोटीची मागणी.

बुलडाणा : कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजने अंतर्गत बुलडाणा जिल्ह्यात सन २0१४-१५ या आर्थिक वर्षात १८ लाभार्थ्यांना ७0 एकर जमिनीचे वाटप करण्यात आले. यावर शासनाने २ कोटी ७ लाख रुपये खर्च केला. मागासवर्गीय घटकाचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागातर्फे विविध योजना राबविल्या जातात. त्यातीलच पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना आहे. या योजनेंतर्गत दारिद्रयरेषेखालील भूमिहीन अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतमजूर कुटुंबीयांना शेतीचे वाटप केल्या जाते. कुटुंबाच्या उत्पन्नाचे स्त्रोत वाढावे, त्यांच्या राहणीमानात सुधारणा व्हावी व या दारिद्रय रेषेखालील लोकांनाही समानतेची वागणूक मिळावी म्हणून शासन ही योजना राबविते. यामध्ये लाभार्थ्यास चार एकर कोरडवाहू किंवा दोन एकर बागायतीची जमीन विकत घेऊन दिल्या जाते. जमीन खरेदीसाठी शासनाकडून ५0 टक्के अनुदान व ५0 टक्के बिनव्याजी कर्ज दिल्या जाते. या कर्जाची फेड १0 वर्षांसाठी आहे. तर कर्जाची परतफेड ही कर्ज मंजुरीनंतर २ वर्षाने सुरू होते. या योजनेचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थी हा अनुसूचित जाती नवबौद्ध घटकातील असावा, लाभार्थी हा दारिद्रय रेषेखालील व भूमिहीन शेतमजूर असावा, लाभार्थ्यांची वयोर्मयादा १८ ते ६0 वर्षापर्यंत असावी. शिवाय विधवा व परितक्ता यांना प्राधान्य देण्यात येते. यावर्षी या योजनेंतर्गत जिल्ह्यातील १८ लाभार्थ्यांना २ कोटी ७ लाख रुपये किमतीची ७0 एकर शेतीचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. येत्या २६ जून या सामाजिक न्यायदिनी सदर लाभार्थ्यांना जमिनीचे वाटप करण्यात येणार आहेत. पुढील वर्षासाठी ४0 प्रस्ताव मंजुरीस पात्र झाले असून, जवळपास चार कोटी रुपयांची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे.