जिल्ह्यात ७ जण पॉझिटिव्ह, एकाची कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:39 IST2021-08-13T04:39:26+5:302021-08-13T04:39:26+5:30

प्रयोगशाळेत तपासण्यासाठी पाठविण्यात आलेल्या १ हजार ९६९ संदिग्धांच्या अहवालापैकी १ हजार ९६२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये चिखली ...

7 positive in the district, one defeated Corona | जिल्ह्यात ७ जण पॉझिटिव्ह, एकाची कोरोनावर मात

जिल्ह्यात ७ जण पॉझिटिव्ह, एकाची कोरोनावर मात

प्रयोगशाळेत तपासण्यासाठी पाठविण्यात आलेल्या १ हजार ९६९ संदिग्धांच्या अहवालापैकी १ हजार ९६२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये चिखली शहरातील एक, करणखेड एक, भालगाव दोन, नायगाव एक, शिवणी एक आणि बुलडाणा तालुक्यातील गजरखेड येथील एकाचा समावेश आहे. आजपर्यंत तपासणी करण्यात आलेल्या संदिग्धांपैकी ६ लाख ६० हजार ६६१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आतापर्यंत ८६ हजार ६१२ जणांनी कोरोनावर मात केली आहे. संदिग्धांच्या तपासणीसाठी घेण्यात आलेल्या अहवालांपैकी १ हजार ७९३ जणांच्या अहवालाची अद्याप प्रतीक्षा आहे. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता ८७ हजार ३५१ झाली आहे. यापैकी ६७ सक्रिय रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. दरम्यान आजपर्यंत जिल्ह्यातील ६७२ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी दिली.

Web Title: 7 positive in the district, one defeated Corona