बुलडाण्यात आणखी ७ पाझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:33 IST2021-03-06T04:33:08+5:302021-03-06T04:33:08+5:30

चिखलीत काेराेना कहर सुरूच चिखली : शहरात काेराेना रुग्णांची संख्या वाढतच असून ५ मार्च राेजी आणखी १७ जणांचा काेराेना ...

7 more positives in Buldana | बुलडाण्यात आणखी ७ पाझिटिव्ह

बुलडाण्यात आणखी ७ पाझिटिव्ह

चिखलीत काेराेना कहर सुरूच

चिखली : शहरात काेराेना रुग्णांची संख्या वाढतच असून ५ मार्च राेजी आणखी १७ जणांचा काेराेना अहवाल पाॅझिटीव्ह आला आहे. चिखली तालुक्यातील मेरा बु १, पेठ १, खैरव १, काेलारा १, उंद्री येथील एकाचा अहवाल पाॅझिटीव्ह आला आहे. तसेच ६५ जणांनी काेराेनावर मात केल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे.

शासकीय कार्यालयांमध्ये काेराेनाचा शिरकाव

बुलडाणा : काेराेनाचा शासकीय कार्यालयांमध्येही शिरकाव झाल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. बुलडाणा तहसील कार्यालयातील तिघांचा अहवाल पाॅझिटीव्ह आला आहे. त्यामुळे, शुक्रवारी तहसील कार्यालय बंद ठेवून निर्जतुकीकरण करण्यात आले.

मेहकरात १७६ जणांना दिली लस

बुलडाणा : जिल्हाभरात ४५ ते ५९ आणि ६० वर्षांवरील व्यक्तींना काेविशिल्ड लस देण्यात येत आहे. शुक्रवारी मेहकर येथे १७६ जणांना काेरानाची लस देण्यात आली.

Web Title: 7 more positives in Buldana