मोताळा बाजार समितीवर आणखी ७ संचालक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 15:51 IST2020-02-12T15:51:18+5:302020-02-12T15:51:22+5:30

सात संचालकांच्या नियुक्त्या केल्या जाण्याची शक्यता असून प्रशासकीय पातळीवर तशा हालचाली सुरू झाल्या आहेत.

7 more directors on the Motala Market Committee! | मोताळा बाजार समितीवर आणखी ७ संचालक!

मोताळा बाजार समितीवर आणखी ७ संचालक!


मोताळा: येथील बाजार समितीच्या प्रशासकीय संचालक मंडळामध्ये अल्पावधीतच सात संचालकांच्या नियुक्त्या केल्या जाण्याची शक्यता असून प्रशासकीय पातळीवर तशा हालचाली सुरू झाल्या आहेत.
जिल्हा उपनिबंधकांनी यासंदर्भात मोताळा बाजार समितीचे सहाय्यक निबंधक पी. पी. भोपळे यांना एक पत्र दिले आहे. त्यानुषंगाने सातही संचालकांची नावे जवळपास निश्चीत झाली असून त्यांच्या विरोधात पोलिसात गुन्हे दाखल तर नाहीत ना, शेती नावे असल्याचा सात बारा, रहिवाशी दाखल आहे किंवा नाही, याची तपासणी केल्यानंतर अनुषंगीक निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती आहे.
महाविकास आघीडचे सरकार स्थापन झाल्यानंतर या बाजार समितीवरही त्यांच्या मर्जीतील व्यक्तीची निवड होण्याचे संकेत आहे.

Web Title: 7 more directors on the Motala Market Committee!