68 species of butterflies in Buldana district | बुलडाणा जिल्ह्यात ६८ प्रकारची फुलपाखरे

बुलडाणा जिल्ह्यात ६८ प्रकारची फुलपाखरे

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जैवविविधतेची भरमार असलेल्या बुलडाणा जिल्ह्यात एका सर्वेक्षणानुसार जवळपास ६८ प्रकारच्या फुलपाखरांच्या प्रजाती आढळतात. मात्र अलिकडील काळात शेतात किटकनाशक फवारण्याचे प्रमाण वाढल्यामुळे या फुलपाखरांना धोका निर्माण झाला आहे.
दरम्यान, दुर्मिळ प्रकारात मोडणारे सिलव्हर लाईन हे फुलपाखरूही ज्ञानगंगा अभयारण्यात क्वचित प्रसंगी आढळून येते. दरम्यान फुलपाखरे प्रामुख्याने दोन प्रकारची असून पतंग आणि फुलपाखरू असे त्याचे दोन प्रकार पडतात. फुलपाखरे म्हंटलेकी ऊन्ह, फुले, पालवी, गवत आणि पानाच्या सावलीत खालील बाजूने प्रामुख्याने पुलपाखरे आढळून येतात. या व्यतिरिक्त मॉथ प्रकरातील फुलपाखरेही जिल्ह्यात आहेत. यात पाच ते सहा प्रकार आढळून येतात. प्रामुख्याने स्थिर पद्धतीने उडणारी ही पुलपाखरे फुलांचा रस शोषत असतात. हे चित्र बघण्यासारखे असते.
त्यातच अलिकडील काळात जंगल परिसरातील तथा गाव परिसरात नदीकाठी, ओठ्याकाठी उगवणारी घाणेरी तोडण्याचा सपाटा सुरू झाला आहे. वास्तविक ही घाणेरी फुलपाखरांच्या अधिवासामध्ये महत्त्वाची भूमिका निभावते. त्यामुळे त्याचे संवर्धन होणे ही काळाची गरज आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे, अशी माहिती बुलडाणा येथील किटक अभ्यासक प्रा. अलोक शेवडे यांनी दिली. या व्यतिरिक्त रस्त्या लगतचा तरोटा, फुले तथा जंगलात आढणारी वनस्पती तथा काटेरी बोंड येणाऱ्या झुडपावर प्रामुख्याने पुलपाखरे आढळून येतात. त्यामुळे फुलपाखरंच्या संवर्धनामध्ये देशी असलेली छोटी झुडपेही महत्त्वाची भूमिका निभावतात.


जिल्ह्यात या प्रजातीची फुलपाखरे झाली दुर्मिळ
बुलडाणा जिल्ह्यात प्रामुख्याने ग्रेट आॅरेंज टीप, अ‍ॅन्जल् कस्टर, ब्लू पॅन्सी, ग्रे पॅन्सी, लेसर ग्रास ब्लू, डार्क ग्रास ब्लू, प्रेल ग्रास ब्लू या प्रजातीची फुलपाखरे दुर्मिळ झाली आहे. प्रामुख्याने किटक नाशकांची वाढती फरवारणी तसेच मदर प्लन्ट नष्ट होत असल्याने फुलपाखरांच्या अधिवासाला धोका निर्माण झाला आहे. जंगली भागात घाणेरीची झुडपेही नष्ट केली जात असल्याने त्यावर अवलंबून असलेल्या फुलपाखरांच्या प्रजातीला धोका निर्माण झाला आहे.

Web Title: 68 species of butterflies in Buldana district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.