६७ जणांनी केले रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:24 IST2021-06-25T04:24:39+5:302021-06-25T04:24:39+5:30

यामध्ये सर्वप्रथम छत्रपती श्री. शिवाजी महाराज व भारतमाता यांचे पूजन श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुदेश लोढे, राष्ट्रीय स्वयंसेवक ...

67 people donated blood | ६७ जणांनी केले रक्तदान

६७ जणांनी केले रक्तदान

यामध्ये सर्वप्रथम छत्रपती श्री. शिवाजी महाराज व भारतमाता यांचे पूजन श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुदेश लोढे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह विभाग प्रचारक वैष्णव राऊत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बुलडाणा जिल्हा संघ चालक शांतीलाल बोराळकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विदर्भ प्रांत सह कार्यवाह राजेंद्र उमाळे, पुरुषोत्तम दिवटे, डॉ. अनिल गाभणे यांनी केले. क्रीडा भारतीचे जिल्ह्याचे दायित्व असलेले डॉ. मोहन राजदेरकर व धर्म जागरण समन्वयाचे प्रांत सह विधी प्रमुख अ‍ॅड. विजय बाजडव इतर सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत रक्तदानास सुरुवात झाली. यावेळी ६७ जणांचे रक्तदान झाले. यामध्ये युवक, युवती, पुरुष व महिला यांचा समावेश होता. यावेळी पर्यावरण प्रेमी गोळे मिस्त्री यांनी स्वतः रक्तदान करुन प्रत्येक रक्तदात्यास स्वखर्चाने बेल, वड, पिंपळ व कडुनिंबाच्या रोपाचे वाटप केले. रक्त संकलन दत्ताजी भाले रक्तपेढी औरंगाबाद यांनी केले. या कार्यक्रमामध्ये श्याम उमाळकर, मेहकर येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. जामकर, डॉ. ठोंबरे, डॉ. विजय चऱ्हाटे, डॉ. पंजाब शेजोळ, डॉ. धनंजय सातपुते, योग प्रशिक्षक सुरनार व इतर मान्यवरांनी भेटी देऊन मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी धर्म जागरण समन्वय व क्रीडा भारतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विस्तारक गणेश चांदुरकर व तालुका कार्यवाह, नगर कार्यवाह इतर सर्व दायित्वधारी व स्वयंसेवक यांनी परिश्रम घेतले.

Web Title: 67 people donated blood