सहा हजार नवमतदारांची नोंद
By Admin | Updated: September 19, 2014 00:32 IST2014-09-19T00:32:50+5:302014-09-19T00:32:50+5:30
बुलडाणा जिल्ह्यात शेवटच्या दिवसापर्यंंत तब्बल ६ हजार ३२८ मतदारांची नोंद.

सहा हजार नवमतदारांची नोंद
बुलडाणा : विधानसभा निवडणुकीसाठी नवीन मतदारांना नाव नोंदणीसाठी काल १७ सप्टेंबर रोजी शेवटची मुदत दिली होती. या मुदतीचा जिल्ह्यातील नागरिकांनी लाभ घेतला असून, शेवटच्या दिवसापर्यंंत तब्बल ६ हजार ३२८ मतदारांची नोंद झाली आहे. यामध्ये सर्वाधिक एक हजार ८४८ मतदारांची नोंद खामगाव मतदारसंघात झाली आहे. सर्वात कमी म्हणजे १२३ मतदार मलकापूर मतदारसंघात वाढले आहे. या सर्व नोंदणी झालेल्या मतदारांच्या कागदपत्रांची आता युद्धपातळीवर तपासणी केली जात असून, या नव मतदारांची आता आणखी भर पडणार आहे.