शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाण्याच्या स्मशानभूमीत २० दिवसात ६० जणांवर अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 11:51 IST

60 cremated in 20 days at Buldana cemetery : २० दिवसात येथील संगम तलावस्थित स्मशानभूमीत ६०  मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यात कोरोनामुळे गेल्या २४ तासात १२ जणांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर बुलडाणा येथील स्मशानभूमीची पाहणी केली असता येथे पार्थिव जाळण्यास जागा कमी पडत असल्याचे चित्र समोर येत आहे. दरम्यान गेल्या २० दिवसात येथील संगम तलावस्थित स्मशानभूमीत ६०  मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे.प्रत्यक्ष स्मशानभूमीमध्ये आणलेल्या पार्थिवांच्या नाेंदी पाहता ही बाब स्पष्ट झाली आहे. या ६० मृत्यूंपैकी कोरोनामुळे नेमके किती मृत्यू झाले आहेत हे स्पष्ट होत नसले तरी बोथारोडवरील हिंदू स्मशानभूमीत जागा कमी पडत असल्याचे चित्र आहे. येथील स्मशानभूमीत पार्थिवाच्या दहनासाठी चार पिंजरे आहेत. मात्र त्या स्मशानभूमीतील मुख्य अंत्यविधीच्या जागेव्यतिरिक्त परिसरात लगतच जागोजागी मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात आल्याचे स्पष्ट जाणवत आहे. बुधवारी प्रत्यक्ष स्मशानभूमीत पाहणी केली असता जवळपास सहा पार्थिंवार गेल्या २४ तासात अंत्यसंस्कार करण्यात आले असल्याचे स्पष्ट दिसत होते. तर दोन चिता अद्यापही जळत असल्याचे समोर आले. स्मशानभूमीमधील मृतांच्या नोंदणी बुकाची पाहणी केली असता त्यात १ एप्रिल ते २० एप्रिल दरम्यान ६० जणांवर अंत्यसंस्कार झाल्याच्या नोंदी समोर आल्या आहेत. त्यामुळे बुलडाण्याची एकंदरीत स्थिती आता बिकट होते की काय, अशी शंका व्यक्त होत आहे. स्मशानभूमीतील मुख्य अंत्यसंस्काराच्या जागेवरील चार पिंजऱ्यांलगतच जेथे जागा मिळेल तेथे मृतांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले असल्याचे एकंदरीत चित्र येथे दिसून आले. 

सहा दिवसात ४० मृत्यूबुलडाणा जिल्ह्यात कडक निर्बंध व रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आल्यानंतर २१ एप्रिलपर्यंत ४० जणांचा मृत्यू झाला आहे. १९ एप्रिल रोजी जिल्ह्यात कोरोनामुळे केवळ एकाचा मृत्यू झाला होता. हा अपवाद वगळता १४ एप्रिलपासून आजपर्यंत सातत्याने कोरोनामुळे मृत्यू पावणाऱ्यांचा आकडा वाढत असल्याचे चित्र आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस