शहरं
Join us  
Trending Stories
1
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
3
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
4
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
5
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
6
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
7
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
8
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
9
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
10
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
11
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
12
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
13
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
14
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
15
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
16
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
17
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
18
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
19
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
20
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल

असोला फाट्यानजीक कार उलटून ५५ वर्षीय महिला ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2020 12:11 PM

Accident News वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर तालुक्यातील तराळा येथील एक महिला ठार झाली

ठळक मुद्दे वाहनाला असोला फाट्यानजीक अपघात झाला. कारमधील वंदना रिकमचंद कोठारी (५५) या ठार झाल्या.

 लोकमत न्यूज नेटवर्कअंढेरा : चिखली-देऊळगाव राजा मार्गावर असोला फाट्यानजीक भरधाव कार उलटून झालेल्या अपघातामध्ये वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर तालुक्यातील तराळा येथील एक महिला ठार झाली, तर अन्य तिघे जखमी झाले आहेत. हा अपघात १८ डिसेंबर रोजी दुपारी घडला.या अपघातामध्ये कारमधील वंदना रिकमचंद कोठारी (५५) या ठार झाल्या असून,  रिकमचंद कोठारी, अक्षय अग्रवाल, निखिता कोठारी या जखमी झाल्या आहेत. दुपारी ३ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. वाशिम जिल्ह्यातील तराळा येथील रिकमचंद कोठारी हे पत्नी, मुलगी व जावयासह देऊळगाव मही येथे कारने (क्र. एमएच २८ व्ही ९९१२) येत होते.  १६ डिसेंबर रोजी ते निघाले होते. दरम्यान, १८ डिसेंबर रोजी त्यांच्या वाहनाला असोला फाट्यानजीक अपघात झाला. त्यात वाहन तीन ते चार वेळा उलटले. त्यामध्ये गंभीर मार लागल्याने वंदना कोठारी यांचा मृत्यू झाला तर अन्य तिघे जखमी झाले. प्रकरणी देऊळगाव मही येथील अशोक फुलचंद कोटेचा यांनी अंढेरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. भरधाव वेगातील या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जात आहे. त्यासंदर्भाने अशोक कोटेचा यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. त्यावरून पोलिसांनी चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. जखमींना पोलीस हेडकॉन्स्टेबल निवृत्ती पोफळे यांनी जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाwashimवाशिम