लोकमत न्यूज नेटवर्कअंढेरा : चिखली-देऊळगाव राजा मार्गावर असोला फाट्यानजीक भरधाव कार उलटून झालेल्या अपघातामध्ये वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर तालुक्यातील तराळा येथील एक महिला ठार झाली, तर अन्य तिघे जखमी झाले आहेत. हा अपघात १८ डिसेंबर रोजी दुपारी घडला.या अपघातामध्ये कारमधील वंदना रिकमचंद कोठारी (५५) या ठार झाल्या असून, रिकमचंद कोठारी, अक्षय अग्रवाल, निखिता कोठारी या जखमी झाल्या आहेत. दुपारी ३ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. वाशिम जिल्ह्यातील तराळा येथील रिकमचंद कोठारी हे पत्नी, मुलगी व जावयासह देऊळगाव मही येथे कारने (क्र. एमएच २८ व्ही ९९१२) येत होते. १६ डिसेंबर रोजी ते निघाले होते. दरम्यान, १८ डिसेंबर रोजी त्यांच्या वाहनाला असोला फाट्यानजीक अपघात झाला. त्यात वाहन तीन ते चार वेळा उलटले. त्यामध्ये गंभीर मार लागल्याने वंदना कोठारी यांचा मृत्यू झाला तर अन्य तिघे जखमी झाले. प्रकरणी देऊळगाव मही येथील अशोक फुलचंद कोटेचा यांनी अंढेरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. भरधाव वेगातील या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जात आहे. त्यासंदर्भाने अशोक कोटेचा यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. त्यावरून पोलिसांनी चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. जखमींना पोलीस हेडकॉन्स्टेबल निवृत्ती पोफळे यांनी जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.
असोला फाट्यानजीक कार उलटून ५५ वर्षीय महिला ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2020 12:14 IST
Accident News वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर तालुक्यातील तराळा येथील एक महिला ठार झाली
असोला फाट्यानजीक कार उलटून ५५ वर्षीय महिला ठार
ठळक मुद्दे वाहनाला असोला फाट्यानजीक अपघात झाला. कारमधील वंदना रिकमचंद कोठारी (५५) या ठार झाल्या.