शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
3
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
4
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
5
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
6
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
7
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
8
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
9
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
10
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
11
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
12
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
13
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
14
निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला
15
बिहार निकालाचा करिश्मा! बाजारात अखेरच्या तासात 'बुल्स रन'; 'या' क्षेत्रात मोठी वाढ, आयटीत मात्र विक्रीचा दबाव
16
पाकिस्तानातून भारतीय महिला अचानक झाली गायब! शोध घेताच समोर आलं धक्कादायक सत्य
17
IND vs SA 1st Test Day 1 Stumps: पहिला दिवस बुमराहनं गाजवला! आता तिसऱ्या क्रमांकावरील प्रयोगावर नजरा
18
बिहारमध्ये भाजपा नितीश कुमार यांचीच 'विकेट' काढणार? स्वत:चा CM बसवायला JDU गरजच नाही...
19
नीतीश कुमारांचं M अन् मोदींच्या Y समोर, तेजस्वींचं 'MY' समीकरण फेल; NDA साठी हे 2 फॅक्टर ठरले 'टर्निंग पॉइंट'!
Daily Top 2Weekly Top 5

५३ दिवसात कोट्यवधी रुपयांच्या कर वसुलीचे ‘टार्गेट’;  पालिका सरसावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 17:44 IST

बुलडाणा: आर्थिक वर्ष संपुष्टात येण्यासाठी अवघे ५३ दिवस उरले असताना कोट्यवधी रुपयांच्या कर वसुलीचे ‘टार्गेट’ पालिकांसमोर आहे.

- ब्रम्हानंद जाधव

बुलडाणा: आर्थिक वर्ष संपुष्टात येण्यासाठी अवघे ५३ दिवस उरले असताना कोट्यवधी रुपयांच्या कर वसुलीचे ‘टार्गेट’ पालिकांसमोर आहे. जिल्ह्यातील पालिकांची मालमत्ता व पाणीपट्टी वसुलीसाठी कसरत सुरू झाली असून उद्दिष्टाच्या ९० टक्के हून अधिक कर वसुलीचे लक्ष पालिकांसमोर आहे. या कर वसुलीच्या आधारावरच पालिकांना पायाभूत सुविधांसाठी अनुदान उपलब्ध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालिकांनी कर वसुलीची बाब गांभीर्याने घेऊन वसुलीची मोहीम सुरू केली आहे. आर्थिक वर्षाच्या अखेरीस सर्व व्यवहार पूर्ण करणे व इतर कामकाजही मार्गी लावण्यासाठी शासकीय कार्यालयात युद्धस्तरावर प्रयत्न सुरू होतात. २०१८-१९ या आर्थिक वर्षाचा शेवट तोंडावर आला असल्याने प्रशासकीय पातळीवरून विविध कामांना वेग आला आहे. मार्च अखरेपर्यंत कर वसुलीचे टार्गेट पालिकांना देण्याता आलेले आहे. शहरातील बहुतांश मालमत्ता धारक आणि काही शासकीय कार्यालयांकडे गेल्या काही वर्षांपासून कर थकीत आहे. अशा मालमत्ता धारकांचे नळ कनेक्शन आणि इतर सुविधा बंद करण्यासोबतच दंडात्मक कारवाईही पालिका प्रशासनाकडून केल्या जाते. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील पालिका प्रशासनाने कर वसुलीकडे आपले लक्ष वळविले आहे. मार्चअखेरची मुदत जवळ येत असल्याने मालमत्ता व पाणीपट्टी वसुलीसाठी पालिकांकडून विशेष पथक नमेण्यात आलेले आहे. या पथकामध्ये १० ते १५ अधिकारी व कर्मचाºयांचा सहभाग असून शहरात प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन मालमत्ता कर व पाणीपट्टी वसुली केली जात आहे. या पथकाची सध्या दारोदारी वारी सुरू आहे. बुलडाणा नगर पालिकेला पाणीपट्टी व मालमत्ता कर वसुलीचे ४ कोटी ४७ लाख ५१ हजार ८०४ रुपये उद्दिष्ट आहे. आतापर्यंत १ कोटी ६२ लाख ७५ हजार ३५७ रुपयांची करवसुली करण्यात आली आहे. बुलडाणा पालिकेचे ३६.३६ टक्के करवसुली आजपर्यंत झाली आहे. जिल्ह्यातील इतर पालिकांमध्येही कर वसुलीच्या मोहीमेला आता वेग आला आहे. 

 बुलडाण्याची पाणीपट्टी वसुली ३२ टक्क्यावरबुलडाणा नगर पालिकेची आतापर्यंत पाणीपट्टी व मालमत्ता कर वसुली ३६.३६ टक्के झाली आहे. त्यामध्ये पाणीपट्टीचे २ कोटी ४२ लाख १५ हजार ४२१ रुपये उद्दिष्टापैकी ७६ लाख ७२ हजार ६२८ रुपये म्हणजे ३२ टक्के वसुली पूर्ण झाली आहे. तर मालमत्ता कर २ कोटी ५ लाख ३६ हजार ८३ रुपये उद्दिष्टापैकी ४१.८९ टक्के म्हणजे ८६ लाख २ हजार ७२९ रुपये वसुली करण्यात आली आहे. 

 नळबंदीसाठी ४८ तासाची डेडलाईनपाणीपट्टी न भरणाºयांची नळ जोडणी बंद करण्यासाठी ४८ तासाची डेडलाईन पालिका प्रशासनाकडुन देण्यात येत आहे. नोटीस आल्यानंतर पाणी कर भरला नाही, तर जेसीबीच्या सहाय्याने नळ कनेक्शन तोडण्यात येते. बुलडाणा पालिकेकडून ही कारवाई सुरू करण्यात आली असून जिल्ह्यातील इतर पालिकांमध्येही कारवाईच्या दृष्टीने हालचाली सुरू आहेत. 

 पाणीपट्टी व मालमत्ता कर वसुलीसाठी पालिका प्रशासनाकडून कार्यवाही सुरू आहे. मार्चअखेरपर्यंत ९० टक्क्यापेक्षा अधिक वसुली पूर्ण होईल. यासाठी प्रत्येक थकीत करदात्यांनी काळजीने आपला कर भरल्यास नळ बंद करण्याची वेळ येणार नाही. - गजानन चिंचोले, कर निरिक्षक, बुलडाणा.  

टॅग्स :buldhanaबुलडाणाTaxकर