शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
4
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
5
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
6
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
7
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
8
बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
9
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
10
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
11
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
12
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
13
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
14
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
15
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
16
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
17
इराणने लवकर शहाणे व्हावे...; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
19
एकीची मेहंदीही निघाली नव्हती, तर दुसरीचे मेमध्ये होते लग्न, पण काळाने घातला घाला
20
मे डे... मे डे... मे डे...! हे उद्योगाचे आर्थिक गाऱ्हाणे नाही तर एका मोठ्या राष्ट्रीय संकटाची नांदी
Daily Top 2Weekly Top 5

५0 टक्के आरोग्य केंद्र ‘आयएसओ’च्या वाटेवर!

By admin | Updated: May 7, 2017 02:12 IST

बुलडाणा जिल्ह्यातील तीन केंद्राना आयएसओ मानांकन.

ब्रम्हानंद जाधवबुलडाणा : आयएसओ मानांकन प्राप्त करून घेण्यासाठी जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये चढाओढ लागली आहे. जिल्ह्यातील एकूण ५२ प्राथमिक आरोग्य केंद्रापैकी ५0 टक्के म्हणजे २६ प्राथमिक आरोग्य केंद्र आयएसओच्या वाटेवर आहेत. तर तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांनी आयएसओचे मानांकन प्राप्त केले आहे. बुलडाणा जिल्ह्यात एकूण ५२ प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यरत आहेत. त्यापैकी काही प्राथमिक अरोग्य केंद्रामध्ये रूग्णांना गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देण्यासाठी प्रयत्न होत आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रात स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र ही नाविन्यपूर्ण योजना हाती घेण्यात आली असून, त्यामुळे रूग्णांना देण्यात येणार्‍या सेवांचा दर्जा उंचावण्यास मदत होणार आहे. जिल्ह्यातील ५२ प्राथमिक आरोग्य केंद्रापैकी २६ प्राथमिक आरोग्य केंद्राची आयएसओ मानांकनासाठी नोंदणी झाली आहे. या सर्व केंद्रामार्फत ग्रामीण व दुर्गम भागातील रूग्णांना गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा दिली जात आहे. तर जिल्ह्यातील ३ प्राथमिक आरोग्य केंद्रांनी आयएसओ नामांकनाचा दर्जा प्राप्त केला आहे. आयएसओ मानांकन मिळविलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये बुलडाणा तालुक्यातील हतेडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, चिखली तालुक्यातील शेलगाव प्राथमिक आरोग्य केंद्र व एकलारा प्राथमिक आरोग्य केंद्राचा समावेश आहे. तसेच काही प्राथमिक आरोग्य केंद्र आयएसओ मानांकन प्राप्त करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. आयएसओ नोंदणी केलेले प्राथमिक आरोग्य केंद्रबुलडाणा २६ प्राथमिक आरोग्य केंद्रांनी आयएसओ अंतर्गत नोंदणी केलेली आहे. त्यामध्ये बुलडाणा तालुक्यातील चांडोळ, वरवंड, पाडळी येथील प्राथमीक आरोग्य केंद्राचा समावेश आहे. चिखली तालुक्यातील उंद्री, किन्होळा व अं.खेडेकर या प्राथमिक आरोग्य केंद्राचा समावेश आहे. देऊळगाव राजा तालुक्यातील अंढेरा, सिंदखेड राजा तालुक्यातील मलकापूर पांग्रा, किनगाव राजा, मेहकर तालुक्यातील डोणगाव, मोताळा तालुक्यातील धामणगाव बढे, पिंप्री गवळी, नांदुरा तालुक्यातील टाकरखेड, शेंबा, वडनेर भोलजी, संग्रामपूर तालुक्यातील वानखेड, खामगाव तालुक्यातील रोहणा, गणेशपूर, बोथाकाजी, अटाळी, मलकापूर तालुक्यातील उमाळी, जळगाव जामोद तालुक्यातील जामोद पि.काळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा समावेश आहे.