५0 टक्के आरोग्य केंद्र ‘आयएसओ’च्या वाटेवर!
By Admin | Updated: May 7, 2017 02:12 IST2017-05-07T02:12:38+5:302017-05-07T02:12:38+5:30
बुलडाणा जिल्ह्यातील तीन केंद्राना आयएसओ मानांकन.

५0 टक्के आरोग्य केंद्र ‘आयएसओ’च्या वाटेवर!
ब्रम्हानंद जाधव
बुलडाणा : आयएसओ मानांकन प्राप्त करून घेण्यासाठी जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये चढाओढ लागली आहे. जिल्ह्यातील एकूण ५२ प्राथमिक आरोग्य केंद्रापैकी ५0 टक्के म्हणजे २६ प्राथमिक आरोग्य केंद्र आयएसओच्या वाटेवर आहेत. तर तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांनी आयएसओचे मानांकन प्राप्त केले आहे.
बुलडाणा जिल्ह्यात एकूण ५२ प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यरत आहेत. त्यापैकी काही प्राथमिक अरोग्य केंद्रामध्ये रूग्णांना गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देण्यासाठी प्रयत्न होत आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रात स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र ही नाविन्यपूर्ण योजना हाती घेण्यात आली असून, त्यामुळे रूग्णांना देण्यात येणार्या सेवांचा दर्जा उंचावण्यास मदत होणार आहे. जिल्ह्यातील ५२ प्राथमिक आरोग्य केंद्रापैकी २६ प्राथमिक आरोग्य केंद्राची आयएसओ मानांकनासाठी नोंदणी झाली आहे. या सर्व केंद्रामार्फत ग्रामीण व दुर्गम भागातील रूग्णांना गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा दिली जात आहे. तर जिल्ह्यातील ३ प्राथमिक आरोग्य केंद्रांनी आयएसओ नामांकनाचा दर्जा प्राप्त केला आहे. आयएसओ मानांकन मिळविलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये बुलडाणा तालुक्यातील हतेडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, चिखली तालुक्यातील शेलगाव प्राथमिक आरोग्य केंद्र व एकलारा प्राथमिक आरोग्य केंद्राचा समावेश आहे. तसेच काही प्राथमिक आरोग्य केंद्र आयएसओ मानांकन प्राप्त करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे प्रयत्न सुरू आहेत.
आयएसओ नोंदणी केलेले प्राथमिक आरोग्य केंद्र
बुलडाणा २६ प्राथमिक आरोग्य केंद्रांनी आयएसओ अंतर्गत नोंदणी केलेली आहे. त्यामध्ये बुलडाणा तालुक्यातील चांडोळ, वरवंड, पाडळी येथील प्राथमीक आरोग्य केंद्राचा समावेश आहे. चिखली तालुक्यातील उंद्री, किन्होळा व अं.खेडेकर या प्राथमिक आरोग्य केंद्राचा समावेश आहे. देऊळगाव राजा तालुक्यातील अंढेरा, सिंदखेड राजा तालुक्यातील मलकापूर पांग्रा, किनगाव राजा, मेहकर तालुक्यातील डोणगाव, मोताळा तालुक्यातील धामणगाव बढे, पिंप्री गवळी, नांदुरा तालुक्यातील टाकरखेड, शेंबा, वडनेर भोलजी, संग्रामपूर तालुक्यातील वानखेड, खामगाव तालुक्यातील रोहणा, गणेशपूर, बोथाकाजी, अटाळी, मलकापूर तालुक्यातील उमाळी, जळगाव जामोद तालुक्यातील जामोद पि.काळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा समावेश आहे.